Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha News: धक्कादायक वास्तव..अकरा महिन्यांत १३८ शेतकऱ्यांची आत्महत्या

एकट्या वर्धा जिल्‍ह्यात अकरा महिन्यांत १३८ शेतकऱ्यांची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : निसर्गाच्या आणि यंत्रणेच्या दृष्टचक्रात जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. विशेष म्हणजे यामुळेच जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) आत्महत्यांच्या आकड्यांत दरवर्षी वाढच होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मागील अकरा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल १३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळल्याची माहिती आहे. (Maharashtra News)

वर्धा (Wardha) जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, हमीभावाची खरेदी वेळेवर नाही आणि चुकारे लवकर नाहीत. पाणी असेल तर शेतीपंपाची वीज कापणी, नुकसानीची भरपाई वेळेवर नाही. विम्याबाबत (Crop Insurance) कचखाऊ भूमिका, अशा निसर्गाच्या आणि यंत्रणेच्या दृष्टचक्रात जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. विशेष म्हणजे यामुळेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या आकड्यांत दरवर्षी वाढच होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

४३ प्रकरणे अपात्र

यंदा जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंतच्या काळात तब्बल १३८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात १३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास घेतला. यात ४३ प्रकरणे पात्र ठरली. तर ४३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तसेच ५२ प्रकरणं चौकशीत प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे.

४० जणांच्‍या वारसांनाच मदत

शेतकरी आत्महत्यांचा आकडा १३८ झाला असला तरी मदत केवळ ४० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांनाच ४१ लाख रुपयांची शासनाकडून मदत मिळाली आहे. त्यामुळे मदतीचे नेमके निकष काय, आणि मदत कशी दिली जाते, याचा देखील गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT