Nandurbar News: ६९ हजार ग्राहकांकडे ४९ कोटी रुपयांची थकबाकी

६९ हजार ग्राहकांकडे ४९ कोटी रुपयांची थकबाकी
Mahavitaran
MahavitaranSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : जिल्ह्यात वीज बिलांच्या थकबाकीदारांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यातील 69 हजार ग्राहकांकडे 49 कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा थकबाकीदारांसाठी (Mahavitaran) महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली आहे. (Tajya Batmya)

Mahavitaran
Accident News: चिमुरडा हवेत उडाला अन्‌..; राँगसाईड छोटा हत्तीची दुचाकीला धडक

वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी (Nandurbar News) वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांकडील वीज पुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेंतर्गत या ग्राहकांनी 31 डिसेंबरपर्यंत वीज बिलांचा भरणा केल्यास त्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत होणार आहे. योजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येत आहे.

थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते. यापूर्वी योजनेचा कालावधी 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2022 असा होता. ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीज बिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com