unseasonal rain hits wardha loss of watermelons minister munde assures help to farmers
unseasonal rain hits wardha loss of watermelons minister munde assures help to farmers saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain Hits Wardha: गारपिटीच्या तडाख्यात शेत शिवार, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात अश्रु; मदतीसाठी कार्यवाही सुरु : धनंजय मुंडे

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha :

अवकाळी पाउस, गारपीट यामुळे वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर परिसरातील शिवारामधील पीक उद्ध्वस्त झाले आहे. गारांच्या तडाख्याने टरबुज, डांगर तसेच इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. दरम्यान अवकाळीने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित जिल्ह्यांना दिल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी दिली. आचारसंहिता असल्याने मदत व पुनर्वसन विभागास मदत जाहीर करण्यास अडचणी, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत होईल असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

अल्लीपुर येथील शेतकरी ज्ञानेश्वर उगेमुगे यांनी तीन ते साडेतीन एकरमध्ये टरबुज पिकाची लागवड केली. त्यासाठी जवळपास तीन लाख रुपये खर्च केला. पिकाचा थेट बांधावरून विक्रीचा सौदा झाला.

सकाळी टरबुज तोडणार आणि व्यापारी येऊन जाणार, चार पैसे पदरी पडतील, असे असताना मंगळवारी पहाटे गारपीट झाली आणि सगळं पीक उध्दवस्त झालं. ज्ञानेश्वर उगेमुगे यांनी साम टीव्हीला शिवार दाखविताना सर्व टरबुजांनाअक्षरशः तडे गेल्याचे दिसून आले.

दीपक कलोडे यांच्या शेतातील डांगर मातीमोल झाले आहे. कलोडे म्हणाले मंगळवारी रात्री गारपीट झाली. त्यात सगळं पीक गार झालं. अशीच स्थिती या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची देखील झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस, गारपिटीने हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जाेर धरु लागली आहे.

शेतक-यांना याेग्य मदतीसाठी कार्यवाही करु : धनंजय मुंडे

राज्याच्या अनेक भागात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विशेष करून आंब्यासाह विविध फळपिकांचे नुकसान झाल्याने संबंधित जिल्हा प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत. निर्धारित वेळेत पंचनामे पूर्ण करून मदतीसाठीचे अहवाल शासनाकडे सादर होतील अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (गुरुवार) पत्रकारांशी बोलताना दिली.

मदत व पुनवर्सन विभागास सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मदत जाहीर करण्यास अडचणी व मर्यादा आहेत. मात्र तरीही प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याची कार्यवाही केली जाईल असे धनंजय मुंडे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Maharashtra Rain News: राज्यातील पावसाची खबरबात! कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर कुठे पिकांनाही फटका

Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

SCROLL FOR NEXT