unseasonal rain damaged white onion in chandur bazjar near amravati Saam Digital
ऍग्रो वन

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

Amravati Unseasonal Rain : अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा, गहू, संत्रा, भाजीपाला, केळीचे अतोनात नुकसान झाले आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात एप्रिल महिन्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे पांढरा कांदा पूर्ण काळा पडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याने शेतक-यांत तीव्र नाराजी पसरली आहे. (Maharashtra News)

अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा, गहू, संत्रा, भाजीपाला, केळीचे अतोनात नुकसान झाले. त्यात गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यांचा रंग पांढरा झाल्याने शेतकऱ्याला आपला गहू कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.

संत्रा पीकही गळाले. त्यामुळे आता संत्रा पिकाचे आर्थिक गणित बिघडले. ते होत नाही तोच केळी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानाची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. दरम्यान सरकारने केवळ आश्वासन देऊ नये प्रत्यक्ष नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेऊ लागली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : ...तर या ईपीएफओ कर्मचाऱ्यांचे खाते होणार बंद; मिळणार नाहीत पैसे

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य लाभेल; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

LPG Price Cut : एलपीजी सिलिंडर ५१ रूपयांनी झाला स्वस्त, मुंबई-दिल्लीत किती किंमत?

UPI Without Internet: इंटरनेटशिवाय देखील करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या फायदे आणि पद्धत

Maharashtra Weather : कोकण, घाटमाथ्यासह 'या' ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT