Akola News
Akola News Saam Tv
ऍग्रो वन

पोल्ट्री शेड मधील कोंबड्यावर अज्ञात वन्यप्राण्यांचा हल्ला; 600 च्यावर कोंबड्या ठार

अॅड. जयेश गावंडे

अकोला - वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या अकोला तालुक्यातील ग्राम कुरणखेड येथील शेतकरी (Farmer) भीमराव मोहोड यांच्या शेतामधील पोल्ट्री फॉर्म मधील कोंबड्या अज्ञात वन्यप्राण्यांनी जखमी करून खाल्ल्या असल्याची घटना घडली आहे. कुरणखेड येथील शेतकरी भीमराव मोहोड यांचे चंडिका देवी संस्थान कुरणखेडला जाणाऱ्या रस्त्याने शेत असून त्यामध्ये त्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून 2016 मध्ये पोल्ट्री शेडची उभारणी केली.

हे देखील पाहा -

तेव्हापासून ते शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या रोहन पोल्ट्री शेठ मध्ये रात्रीच्या सुमारास पोल्ट्री शेड मधील इंडियन बॉयलर जातीच्या अंदाजे सहाशेच्या वर कोंबड्या मृत्यू अवस्थेत आढळून आल्या आहेत. कोंबड्यावर अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून खाल्ल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांनी लगेच वन विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर वनरक्षक राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

तसेच कुरणखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ताथोड यांनी कोंबड्यांची पाहणी करून उर्वरित तपासणी केली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी शेतकरी नितीन भीमराव मोहोड यांनी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: शरद पवार हे देशाचे शक्तीशाली नेते : संजय राऊत

Thane Loksabha: ठाण्याची जागा शिवसेनेकडेच! CM शिंदेंचा विश्वासू शिलेदार उतरणार मैदानात; लवकरच घोषणा?

GT vs RCB,IPL 2024: बेंगळुरुसमोर गुजरातचं आव्हान! पाहा हेड टू हेड रेकॉर्ड अन् पिच रिपोर्ट

Sonu Sood Whats Up Get Blocked : अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सॲप ब्लॉक; नेमकं कारण काय ?

Ishan Kishan Fined: पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का! इशान किशनवर BCCI कडून मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT