'आप'चे मंत्री ईडीच्या रडारवर; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्या घरावर छापे

सत्येंद्र जैन यांना ईडीने ३० मे रोजी याच प्रकरणी अटक केली आहे.
Satyendar Jain News, AAP Latest Marathi News
Satyendar Jain News, AAP Latest Marathi NewsSaam Tv

नवी दिल्ली - दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत आलेल्या सत्येंद्र जैनच्या अनेक ठिकाणी ईडीचे (ED) पथक छापे टाकले आहे. 30 मे रोजी ईडीने सत्येंद्र जैन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ताब्यात घेतले होते.अटकेनंतर सत्येंद्र जैन यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहेत. (AAP Latest Marathi News)

ईडीने 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती

ईडीने कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित हवाला व्यवहाराप्रकरणी सत्येंद्र जैन यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. यापूर्वी एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 अंतर्गत जैन यांच्या कुटुंबाची आणि कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या मालमत्तांचा समावेश आहे.

Satyendar Jain News, AAP Latest Marathi News
भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये! नुपूर शर्मा अन् नवीन कुमार यांची पक्षातून हकालपट्टी

जैन यांच्या अटकेनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आरोग्यमंत्र्यांना ईडीने खोट्या प्रकरणात अटक केल्याचा आरोप केला होता तसेच काही दिवसांत त्यांची सुटका होईल, असा दावा केला होता. हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी ते आम आदमी पक्षाचे प्रभारी आहेत आणि भाजपला तेथे निवडणूक हरण्याची भीती आहे त्यामुळे हे केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ३० मे रोजी चौकशी केल्यानंतर, जैन यांना मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्येंद्र जैन हे दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, उद्योग, ऊर्जा, गृह, शहरी विकास आणि पाणी मंत्री आहेत. सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे सोपवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com