भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये! नुपूर शर्मा अन् नवीन कुमार यांची पक्षातून हकालपट्टी

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबद केलेल्या वक्तव्यानंतर आता आखाती देशांमध्ये भारताविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
Nupur Sharma/ Naveen Jindal
Nupur Sharma/ Naveen JindalSaam Tv

नवी दिल्ली - इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur sharma) आणि दिल्ली भाजप (BJP) नेते नवीन कुमार जिंदाल (Naveen Jindal) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात पक्षाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली भाजपचे मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नवीन कुमार जिंदाल यांनी या मुद्द्यावर काही वादग्रस्त ट्विट केले होते.

हे देखील पाहा -

अशा परिस्थितीत आता भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी एक पत्र जारी करताना म्हटले आहे की, नवीन कुमार जिंदाल यांनी जातीय सलोखा भडकवणारे विचार सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. हे भारतीय जनता पक्षाच्या मूळ कल्पनेला विरोध करणारे आहे.

आखाती देशांसोबत भारताचे चांगले संबंध राहिले आहेत. मात्र, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबद केलेल्या वक्तव्यानंतर आता आखाती देशांमध्ये भारताविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या आखाती देशांमध्ये कुवेत, इराण, बहारीन, कतार आणि ओमान यासह अन्य देशांचा देखील समावेश आहे.

पक्षाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर नुपूर शर्मा यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना तसेच लोकांना त्यांच्या घराचा पत्ता सार्वजनिक करू नये, असे आवाहन केले आहे. यामुळे माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Nupur Sharma/ Naveen Jindal
Akola : लहान भावाचे वहिनीसोबत संबंध; रंगेहाथ पकडल्यानंतर पतीलाच रॉडने मारहाण

तर कारवाईनंतर नवीन कुमार जिंदाल म्हणाले की, माझी सर्वांना विशेष विनंती आहे की, माझा पत्ता सार्वजनिक करू नका. सोशल मीडियावर मला आणि माझ्या कुटुंबीयांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यांनी ट्विट केले की, आम्ही सर्व धर्मांच्या श्रद्धेचा आदर करतो, पण प्रश्न फक्त त्या मानसिकतेचा आहे जे आमच्या देवतांवर अशोभनीय टिप्पणी करून द्वेष पसरवतात.

आखाती देशात स्थलांतरित कामगारांपैकी 30 टक्के कामगार हे भारतीय आहेत. लाखो भारतीय या देशांमध्ये काम करतात. आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांकडून संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला जातो. या देशांमधून रोजगारासाठी स्थलांतरीत असलेल्या भारतीयांकडून 40 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम भारतात येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com