maval, farmer, banana, jalgoan saam tv
ऍग्रो वन

मावळातील युवा शेतक-यांची जळगावच्या केळी विक्रेत्याने केली फसवणुक; कृषी विभागाने घेतली दखल

बनावट बियाणे किंवा केळीची रोपे याचा फटका मावळातील दोन शेतकऱ्यांना बसला.

दिलीप कांबळे

मावळ : भाताचा (rice) आधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात (maval) तरुण (youth) शेतकऱ्यांनी (farmers) आपण काही वेगळा प्रयोग केला पाहिजे. म्हणून जळगाव येथून हजारोंच्या संख्येने केळीचे रोपे आणली. मात्र ती रोपे बोगस निघाली. केळीचे झाडे मोठी तर झाली मात्र त्याला केळीच आली नाही. त्यामुळे मावळातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. (maval latest marathi news)

टाकवे येथील बाबाजी गायकवाड यांचे पंधरा लाखाचे तर भोयरे गावाचे काळूराम भोयरे यांचे बारा लाखाचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांनी मावळ तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रितसर G-9 या जळगांवच्या केळी विक्रेतेच्या विरोधात दाद मागितली आहे. या तक्रारीनंतर कृषी अधिकारी यांनी या बागेचा पंचनामा केला आहे.

मावळ तालुक्याला निसर्गाने भरभरून दिला आहे. मावळात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते म्हणून याला भाताचे आगार म्हटले जाते. आता मात्र वेळेवर मजूर मिळत नाही तर अवकाळी पावसाने भात शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याने आपण काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे म्हणून तरुण शेतकरी बाबाजी गायकवाड आणि काळूराम भोईर यांनी साडे चार एकरावर केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाववरून पाच हजार केळीची रोप आणली.

या शेतक-यांनी आपल्या शेतात केळीची बाग फुलविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता आठव्या महिन्यात फळ धारणा होऊन दहाव्या महिन्यात केळी विक्रीसाठी मार्केटमध्ये जातात परंतु दीड वर्ष होऊन गेले तरी या बागेतील केळीची वाढ झालीच नसल्याने जळगाववरून आणलेली केळीचे रोपे बोगस असून आपली फसवणूक झाल्याने शेतकरी हवालदिल झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ओबीसी नेते लक्ष्मण हाके अंजनगाव खेलोबामध्ये दाखल

मालेगाव महापालिकेत पुन्हा राडा; इस्लाम आणि MIM च्या नगरसेवकांची एकमेकांना धक्काबुक्की

पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूरसह उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपलं; शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार! रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनं पाण्यात बुडाली; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Natural Hair Growth Tips: लांब आणि दाट केसांसाठी 'दह्याचा' असा करा वापर; घरच्या घरी मिळवा पार्लरसारखी ट्रिटमेंट

SCROLL FOR NEXT