jalna, jalna agriculture department
jalna, jalna agriculture department saam tv
ऍग्रो वन

Jalna News : बंदी असलेल्या कीटक नाशकाच्या मालासह दाेघे ताब्यात, जालन्यात कृषी विभागाची कारवाई

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या कीटक नाशकांची सुमारे दाेन हजार पाकिटे जालना जिल्ह्यात जप्त करण्यात आली आहेत. कृषी विभागाच्या पथकाने (jalna agriculture department) सापळा रचून ही कारवाई केली आहे.  (Maharashtra News)

देशासाह राज्यात केंद्र सरकारने बंदी घेतलेल्या कीटकनाशकाची प्रतिबंधित असलेल्या पोरेट कंपनीच्या 2000 हजार पाकिटे भोकरदन तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर विक्रीसाठी येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यलयाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने भोकरदन जालना महामार्गावरील राजुर ते बरंजळा फाट्यादरम्यान दोन पथकाच्या माध्यमातून सापळा रचला.

त्या परिसरात येणा-या माल वाहतुकीच्या वाहनांची तपासणी करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी एका वाहनात पोरेट कंपनीच्या कीटकनाशकाची पाकिटे पथकास आढळली. संबंधित वाहन ताब्यात घेत 2000 पाकिटांसह एकूण सात लाख 84 हजाराचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला.

त्यानंतर रात्री उशिरा हसनाबाद पोलिस ठाण्यात पोरेट कंपनीच्या व्यवस्थापन आणि दोन विक्रेत्यासह वाहन चालका विरुद्ध तक्रार दिली.

चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारने पर्यावरणास घातक असलेल्या कीटकनाशकांचा विक्री करण्याचा प्रयत्न केला जात हाेता असे तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पाेलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर चालकासह एका विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक तपास हसनाबाद पोलीस करत आहे.

बुलढाण्यात एक कोटी पंचवीस लाखांचे बियाणे गोडाऊन सिल

दरम्यान बुलढाण्या जिल्ह्यातील खामगाव (khamgoan) शहरातील अंकुर कृषी केंद्र चालकाने एका शेतकऱ्याला सोयाबीन बियाण्याच्या एका बॅग वर 3600 रुपये किंमत असताना शेतकऱ्याकडून तब्बल 4200 रुपये घेतले अशी तक्रार हाेऊ लागली.

ही तक्रार समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कृषी केंद्र गाठत कृषी केंद्र चालकास चांगलच धारेवर धरले. तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यास पाचारण करून कृषी केंद्र सिल करण्याची करण्यास भाग पाडले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : बिग बॉस फेम एजाज खान निवडणुकीच्या मैदानात

Sushma Andhare Helicopter Crash News : सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा घडला?

Parenting Tips: मुलांना सुट्ट्यांमध्ये फिरायला घेऊन जाताय? त्यांना आधी शिकवा महत्वाच्या गोष्टी

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

SCROLL FOR NEXT