दुःखद! ऐन दिवाळीत चंद्रपूर जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या! संजय तुमराम
ऍग्रो वन

दुःखद! ऐन दिवाळीत चंद्रपूर जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

बँकेने घरातील सामानांचा लिलाव करीत असल्याची नोटीस महेशला पाठविली. डोळ्यादेखत घरातील वस्तुंचा लिलाव होणार, हा विचार असह्य झाल्याने अखेर विष प्राशन करून दीपोत्सवाच्या दिवशी महेशने जीवन संपविले.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील महेश मारकवार या 35 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. त्यांच्या नावाने दोन एकर शेतजमीन आहे. गोंडपिपरी शहरातील एका खाजगी बँकेतून त्याने 7 लाख कर्ज उचलले होते. काही रक्कम त्याने भरली. मात्र कर्जाचा आकडा वाढतच गेला.

हे देखील पहा :

अश्यात त्या बँकेने घरातील सामानांचा लिलाव करीत असल्याची नोटीस महेशला पाठविली. चेकपिपरी ग्रामपंचायतलाही नोटीसची एक प्रत पाठविण्यात आली आणि वृत्तपत्रात जाहीरात देण्यात आली. याप्रकाराने आपली फार बदनामी झाली. डोळ्यादेखत घरातील वस्तुंचा लिलाव होणार, हा विचार असह्य झाल्याने अखेर विष प्राशन करून दीपोत्सवाच्या दिवशी महेशने जीवन संपविले.

दुसऱ्या एका घटनेत घुग्गुस येथील शेणगावच्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन बळीराम लटारी ठावरी (62) रा. शेणगाव यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविला आहे. पहाटे 5 वाजता ते घरून शेताकडे निघाले. वाटेत एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नापिकी आणि कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Renuka Shahane : 'तेव्हा आईची खरी किंमत कळते...', रेणुका शहाणेंनी सांगितले आईचं महत्त्व, पाहा VIDEO

Shocking : पुणे हादरले! वीट आणि दांडक्याने मारहाण करत महिलेची हत्या, ३ दिवस घरातच ठेवला मृतदेह

Lemon Water Benefits: सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्या, शरीरात होतील जबरदस्त बदल

Zodiac signs: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! अमावस्येनिमित्त ‘या’ राशींचं बदलणार भाग्य

Maharashtra Live News Update: रुपाली ठोंबरेंनी माधवी खंडाळकर यांना पाठवली १० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस

SCROLL FOR NEXT