आदिवासी शेतक-यांना भात लागवडीसाठी प्रतिक्षा पावसाची .. रोहिदास गाडगे
ऍग्रो वन

आदिवासी शेतक-यांना भात लागवडीसाठी प्रतिक्षा पावसाची ..

संकटात सापडलेला भिमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकरी भात लागवडीसाठी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे : एकीकडे कोरोना Corona महामारीचं संकट तर दुसरीकडं पावसाची Monsoon प्रतिक्षा आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेला भिमाशंकर Bhimashankar परिसरातील आदिवासी शेतकरी भात लागवडीसाठी Paddy cultivation पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहे. पाऊस जर पडला नाही तर पेरलेली भाताची रोपे भात पेरणी फुकट जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. Tribal farmers wait for rains for paddy cultivation

मागील आठवड्यात चार दिवस मुबलक पाऊस झाला. अशातच भिमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकरी भात लागवडीत व्यस्त झाला. मात्र आता अचानक पाऊसाने दांडी मारल्याने भातशेती संकटात आली आहे. तर लागवड झालेल्या भाताला पाणी नसल्याने मोठं संकट शेतक-यांसमोर उभं राहिले आहे.

हे देखील पहा-

सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीतील भिमाशंकर परिसरातील आदिवासी बांधवांचे अर्थकारण हिरडा व भात शेतीवर अवलंबुन आहे. मात्र यंदा हिरड्याचेही उत्पादन घटले आणि आता भात लागवडीलाच पाऊसाने दांडी मारल्याने आदिवासी शेतकरी संकटात सापडला आहे. कोरोना काळातही हाताला काम मिळाले नाही निसर्गाच्या लहरीपणामुळे आदिवासी कुटुंबाचे अर्थकारण कोलमडत चालले आहे.

कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करत असताना आता निसर्गाच्या लहरीपणामुळे आदिवासी शेतक-यांना आता पावसाची चिंत्ता लागली आहे. यंदा भाताची लागवड पाऊसाच्या प्रतिक्षेत गेली तर वर्षाभराचे अर्थकारण कोलमडण्याची भिती शेतक-यांनी व्यक्त केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT