सागर आव्हाड
पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने Central Railway Administration वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जुलैपासून पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेससह Indrayani Express देशाच्या विविध भागांतील दहा मार्गांवर प्रवासी सेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. Ten trains will run with Pune-Mumbai Indrayani Express from July 1
राज्यातील विविध इंटरसिटी रेल्वे Intercity Railway लॉकडाउनमधील निर्बंध आणि घटती प्रवासी संख्या यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांची संख्या आता 'अनलॉक'च्या Unlock पार्श्वभूमीवर वाढत आहे. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील इंद्रायणी एक्स्प्रेस सेवा येत्या एक जुलैपासून सुरू होणार आहे. याशिवाय विशेष एक्स्प्रेसची नागपूर, अजनी, अमरावती, अहमदाबाद या मार्गांवर सेवा सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेसची सेवा येत्या एक जुलैपासून सुरू होणार आहे.
दोन जुलैपासून पुणेमार्गे जाणारी कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस, नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस सुरु होणार आहे.
तीन जुलैपासून, नागपूर-पुणे एक्स्प्रेस आणि पुणे-नागपूर एक्स्प्रेस
चार जुलैपासून, अजनी-पुणे एक्स्प्रेस
सात जुलैपासून, पुणे-अमरावती एक्स्प्रेस
आठ जुलैपासून अमरावती-पुणे एक्सप्रेस धावणार आहेत.
हे देखील पहा-
नागपूर आणि अजनी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष एक्स्प्रेससह Express पुणे-अजनी Pune-Ajani एक्स्प्रेस या मार्गावरून एक जुलैपासून धावणार आहेत.
दर सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी धावणारी विशेष पुणे-अहमदाबाद एक्स्प्रेस एक जुलैपासून धावणार आहे.
दर मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी धावणारी विशेष अहमदाबाद-पुणे Ahmedabad-Pune एक्स्प्रेस दोन जुलैपासून धावणार आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.