tomato 
ऍग्रो वन

टोमॅटोचा दर दुप्पटीने वाढला; गृहिणींचे मंडईचे बजेट काेलमडले

जयश्री मोरे

मुंबई : हिरव्या भाज्यांनंतर आता टोमॅटो स्वयंपाकघरातून बाहेर पडत आहे. या पंधरवड्यात टोमॅटोचा दर दुप्पटीने वाढल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट काेलमडू लागले आहे. सध्या टोमॅटो किरकोळमध्ये सुमारे ८० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. पंधरवड्यापूर्वी टोमॅटोचा भाव ३० ते ४० रुपये किलो असा हाेता. पुरवठा कमी झाल्याने किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव दुप्पट झाले आहेत. हा दर आणखी वाढची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. tomata-price-hiked-in-maharashtra-agro-news-sml80

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांत राज्यात झालेल्या संततधार पावसामुळे महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. चेंबूरच्या भाजी मंडईत छाेटा टाेमॅटाे ६० रुपये किलाे, माेठा टाेमॅटाे सुमारे ८० ते ९० रुपये किलाे असे मिळत आहे.

नवरात्री असून सुद्धा भाज्यांचे दर वाढले आहेत. आता त्यापाठाेपाठ टाेमॅटाेचे दर वाढले आहेत. त्यामुळे आमचे आर्थिक बजेट काेलमडू लागले आहे. सर्वसामान्य माणसांना आता भाजी घेणे देखील परवडत नसल्याने त्यांना फार मनस्ताप हाेत आहे असे गृहिणींनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT