"या" कंपनीने शेतकऱ्यांना घातला तब्बल तीन कोटींचा गंडा ! सागर गायकवाड
ऍग्रो वन

"या" कंपनीने शेतकऱ्यांना घातला तब्बल तीन कोटींचा गंडा !

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना पाडवा ऍग्रो सोल्युशन फर्म या कंपनीने तब्बल अडीच ते तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर गायकवाड

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना Grape growers पाडवा ऍग्रो सोल्युशन फर्म Agro Solution Firm या कंपनीने तब्बल अडीच ते तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. The agro solution firm cheated the farmers to the tune of Rs 3 crore

यामध्ये दिंडोरी, त्रंबकेश्वर, निफाड,चांदवड या तालुक्यांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या कंपनीने शेतकऱ्यांकडून एक्स्पोर्ट द्राक्ष खरेदी केली. मात्र त्यांना पैसे दिलेच नाहीत. जे चेक दिले गेले, त्या अकाउंटवर पैसे नसल्याचं समोर आलं आहे.

हे देखील पहा-

अडीच ते तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी कंपनी विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. जवळजवळ 50 ते 60 शेतकऱ्यांची यात फसवणूक Cheating झाल्याची माहिती आहे. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील 7 जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

अशी माहिती आहे की, पाच जण मिळून ही कंपनी सुरू केली होती. मात्र शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तर देत त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar नाशिक Nashik दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे ही या कंपनी बाबत तक्रार केली आहे. तसेच जो पर्यंत आमचे पैसे मिळत नाही. तोपर्यंत अटक केलेल्याना जामीन मिळू नये अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT