संजय तुमराम
चंद्रपूर : चंद्रपूरकरांची प्रतीक्षा एकदाची संपली आहे ! चंद्रपुरात आज मद्यपींसाठी 'सोनियाचा दिनू' आहे. मद्यशौकीन ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते, तो दिवस आज उजाडला आहे. After 6 years, liquor sales will start again in Chandrapur
1 एप्रिल 2015 रोजी जिल्ह्यात दारू बंद झाली होती, तर 27 मे 2021 च्या राज्य सरकारच्या आदेशानुसार ती पुन्हा सुरू होत आहेत. उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केलेले दारू परवाने 3 ठिकाणाहून सिंगल विंडो पद्धतीचा वापर करत अत्यंत विद्युतगतीने पूर्ण केले आहे. मद्य शौकिनांसाठी प्रतीक्षा असलेल्या या बाबीसाठी आज जिल्हाभरात 100 हून अधिक बार रेस्टॉरंट आणि काही दारू दुकाने खुली होणार आहेत.
हे देखील पहा-
6 वर्षानंतर चंद्रपुरात पुन्हा एकदा दारू विक्रीला प्रारंभ होणार आहे. शहरातील हॉटेल आणि बार मालकांनी आपापली प्रतिष्ठाने सज्ज केली आहेत. चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क विभागाने 490 परवानेधारकांपैकी चौकशीनंतर 98 दारू परवाने नियमित करून मान्यता प्रदान केली.
आज दुपारनंतर नागपूरहून बोलावण्यात आलेल्या दारूसाठ्यातून दारू वितरण होऊ शकणार आहे. सकाळपासून दारू विक्री सुरू झाली का, याचा अदमास घेण्यासाठी शौकिनांची हॉटेल्सपुढे घुटमळ बघायला मिळत आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.