...अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या; आरोग्य कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
...अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या; आरोग्य कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीसंजय जाधव

...अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या; आरोग्य कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे जिल्ह्यातील 1300 आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे.
Published on

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा Buldhana जिल्ह्यातिल 61 कोविड सेंटर व जिल्हा सामान्य रुगालयातील एन आर एच एम अंतर्गत कंत्राटी 1300 आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यापासुन रखडले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हेकेखोरपणामुळे रखडले असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरनीवर आल्याचे स्प्ष्ट झाले आहे. Salary of 1300 health workers in Buldhana district is stagnant.

आता रखडेलेले वेतन द्या अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्रयाकडे CM या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीने जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

देशभरात जेव्हा कोरोनाचे Corona आगमन झाले, त्यावेळेस सर्व देशवासीयांच्या मनात प्रचंड भीती होती. त्यावेळेस कोविड रुग्णालयात काम करण्यास कोणीही धजावत नव्हते, अश्या भयावय परिस्थितीत डॉ व कर्मचारयांची कंत्राटी भर्ती करण्यात आली. स्वतःचा जीव धोक्यात घालून नाममात्र मानधनावर या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. मात्र आता चार महीने उलटून गेलीत अद्याप पर्यंत पगार नाही. त्यामुळे 1300 डॉक्टर व कर्मचाऱ्यांना उपासमारीची पाळी आली आहे.

...अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या; आरोग्य कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
किटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यानी कागदोपत्रात त्रुटी दाखवत वेतनापासून वंचित ठेवन्याचे काम जिल्हा आरोग्य विभाग करीत आहे. यात कर्मचाऱ्यांना वेतनासाठी रक्कम मागितली जात असल्याचे दबकया आवाजात कर्मचारी बोलत असल्याचा आरोप सुद्धा होत आहे.

रखड़लेले वेतन मिळावे यासाठी कित्येक वेळा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. मात्र जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाला जाग येत नसल्याचे दिसून येत, असल्याने आता आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशी मागणी चक्क मुख्यमंत्रयाकडे केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com