Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : युट्युब पाहून तरुणानं फुलवली चाफ्याची बाग; महिन्याकाठी सरासरी ३५ हजारांचे उत्पन्न

Thane News : वांगणी येथील युवा शेतकरी संदेश सारंगा यांनं कोरोना काळात शेती करण्याचा निर्णय घेत युट्युबवर व्हिडिओ पाहण्यास सुरवात केली. यातून त्याने एक एकर जागेत चाफ्याची झाडे लावण्याचा निर्णय घेतला

Rajesh Sonwane

मयुरेश कडव 

वांगणी (ठाणे) : कोरोना काळात लोकडाऊन लागल्याने अनेकांचे नुकसान झाले. तर काहींचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. मात्र याच काळात ठाणे जिल्ह्यातल्या वांगणी जवळील डोणे गावात राहणाऱ्या तरुणाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. संदेश सारंगा या तरुण शेतकऱ्यानं चक्क युट्युब पाहून एक एकरात चाफ्याची बाग फुलवली. या बागेतून आता त्याला महिन्याकाठी ३० ते ३५ हजारांचं उत्पन्न मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील युवा शेतकरी संदेश सारंगा यांनं कोरोना काळात शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने युट्युबवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यास सुरवात केली. यातूनच त्यांने आपल्या एक एकर जागेत चाफ्याची झाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन शासकीय अनुदान मिळवलं आणि वांगणी जवळच्या डोणे गावात एक एकरात सौंदर्य जातीच्या चाफ्याची ३०० झाड लावली.

३ बाय ३ मीटर अंतरावर या झाडांची लागवड केली. आता चार वर्षांच्या या बागेतून दररोज १५०० ते १८०० फुलांचे उत्पन्न मिळत आहे. कल्याण तसेच दादरच्या फुल मार्केटमध्ये चाफ्याच्या फुलाला सरासरी एक ते दोन रुपयांचा भाव मिळतो. गणेशोत्सव काळात हाच भाव जवळपास पाच ते दहापट अधिक झालेला असतो. या बागेतून सर्व खर्च वगळता संदेश सारंगा याला महिन्याकाठी सरासरी ३० ते ३५ हजारांचं उत्पन्न मिळत आहे. 

कोरोना काळात आयुष्याला कलाटणी

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेले. यामुळे आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागले. यातून सावरत असताना आर्थिक गणित देखील कोलमडले होते. लोकडाऊन असल्याने सर्वजण घरीच होते. यामुळे घरी बसून राहण्यापेक्षा शेती करण्याचे संदेश याने ठरविले. या काळात युट्युबवर माहिती घेऊन चाफ्याची शेती करण्याचा निर्माण घेतला. आता हा निर्णय योग्य ठरत असून तेव्हापासूनच संदेशच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT