success story of chetan nimbalkar who groves starwberry in drought area  saam tv
ऍग्रो वन

Success Story: दुष्काळी भागात बहरली स्ट्रॉबेरी; करमाळ्यातील इंजिनिअर युवकानं करुन दाखवलं

काेराेना काळानंतर हताश न‌ होता गावी येऊन चेतन निंबाळकर याने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी ठरला.

भारत नागणे

Pandharpur News :

जिद्द,चिकाटी आणि अपार कष्ट करण्याची तयारी असली की कोणत्याही कामात यश येते हे साेलापूर जिल्ह्यातील युवकाने सिद्ध करुन दाखविले आहे. करमाळ्यातील युवकाने ज्याने स्वत: अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन देखील थंड हवेच्या ठिकाणी पिकणारी स्ट्राॅबेरी, उष्ण हवामान असलेल्या दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात केवळ पिकवू शकताे हे केवळ दाखवून दिले नाही तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते असा विश्वास देखील साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला. (Maharashtra News)

मेकॅनिकल इंजिनिअर असलेला चेतन निंबाळकर हा तरूण करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील आपल्या शेतीत आता चांगलच रमला आहे. सतत नाविन्याचा शोध घेणा-या चेतन‌ याने आपल्या शेतीत विविध प्रयोग केले आहेत. उष्ण हवामान असलेल्या दुष्काळी भागात त्याने पहिल्यांदाच स्ट्राॅबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी (success story of chetan nimbalkar who groves starwberry in drought area) केला आहे.

सप्टेंबर महिन्यात चेतन याने 20 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली. लागवडी नंतर पाणी,खते यांचे योग्य नियोजन केले. शिवाय कीड आणि किटकांवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्याने काळ्या मातीत लाल स्ट्रॉबेरीची शेती चांगलीच बहरली आहे‌.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

90 दिवसानंतर स्ट्राॅबेरीचे उत्पादन सुरू झाले असून शेवटपर्यंत 4 टन उत्पादन त्याला अपेक्षित आहे. सध्या पुणे, सोलापूर, इंदापूर येथे 400 रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. बाजारभाव टिकून राहिला तर 6 ते 7 लाख रूपये उत्पन्न मिळेल असा विश्वास चेतन याने व्यक्त केला आहे.

चेतन निंबाळकर (chetan nimbalkar) हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होता. लाॅकडाऊन मध्ये तो परत आपल्या गावी आला. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असलेल्या चेतन याने हताश न‌ होता. गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन वर्षात चेतन याने ऊस,केळी या पिकातून चांगले उत्पन्न घेतले आहे. लोकांची मागणी आणि बाजार भाव याचा अभ्यास करून त्याने स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यात तो यशस्वी झाला‌ आहे.

स्ट्रॉबेरी हे पिक महाबळेश्वर, पाचगणी या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी घेतले जाते. परंतु चेतन याने उष्ण हवामान असलेल्या दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात देखील स्ट्रॉबेरी पिक घेता येते हे प्रयोगाअंती सिध्द केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT