लातूर : लातूरच्या बाजारपेठेत (Latur Market) 18 सप्टेंबरला सोयाबीनचा प्रति क्विंटल भाव 8 हजार 200 रुपये होता. आज 22 सप्टेंबरला सौद्यात तो 5 हजार 800 रुपये एवढा घसरला. जुलै महिन्यात सोयाबीनचे भाव 10 हजारांपेक्षा अधिक होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात (oil import duty) केलेली घट, सोयाबीन पेंडीची विदेशातून 12 लाख मेट्रिक टनांची केलेली आयात यामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव गडगडायला सुरुवात झाली.(Soybean prices fell, soybean growers in crisis)
सप्टेंबर अखेर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारपेठेत यायला सुरुवात होईल. एका दिवसात बाजारपेठेत सोयाबीनच्या भावात तब्बल 3600 रुपयांची घसरण झाली आहे. सौद्यात मिळालेला भाव 5 हजार 800 असला तरी ओलाव्याचे प्रमाण, मातीचे प्रमाण हे निकष लावून यापेक्षा कमी भावात सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. दरम्यान, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड (Nanded) या जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. दरम्यान, सोयाबीन या पिकाला लागेल तसा पाऊस देखील पडल्याने सोयाबीन हे पिक अंत्यंत उत्तम प्रकारे आलेले आहे. त्यामुळे आवक वाढणार आणि भाव कोसळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने (Central Goverment) मागच्या महिन्यात पोल्ट्री आणि मत्स्य व्यावसायिकांना लागणार सोयाबीनचे पशुखाद्य महाग मिळत असल्याने 12 लाख मेट्रिक टन सोयाबीनला परवानगी दिली आता शेतकऱ्यांचा माल बाजारात येत असताना साडेपाच हजारावर येऊन ठेपले आहेत 'सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांच मरण होत आहे'. अदानी ग्रुपला खाद्यतेलासाठी सोयाबीन हा कच्चा माल स्वस्तात उपलब्ध व्हावा यासाठी भाव पाडले जात असून शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात जाणार आहे सरकारला याची मोठी किमंत मोजावी लागणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला आहे.
सोयाबीन या पिकाची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने या पिकाचा भाव निश्चितपणे कमी होणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना यंदा हे पिक नुकसानीत घालणार असल्याचा अंदाज काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.