मुख्यमंत्री हतबल आहेत की त्यांनी प्रस्थापितांच्या पुढे... - आ. पडळकर (पहा व्हिडिओ)

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाबाबत राजकारण तापलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
मुख्यमंत्री हतबल आहेत की त्यांनी प्रस्थापितांच्या पुढे... - आ. पडळकर (पहा व्हिडिओ)
मुख्यमंत्री हतबल आहेत की त्यांनी प्रस्थापितांच्या पुढे... - आ. पडळकर (पहा व्हिडिओ)रश्मी पुराणिक
Published On

रश्मी पुराणिक, मुंबई

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाबाबत राजकारण तापलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अध्यादेश स्वाक्षरी करण्यासाठी पाठवला होता. मात्र राज्यपालांना त्यात काही शंका असल्याने त्यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे राज्यात राजकारण तापलं आहे. (BJP MLA Gopichand padalkar slams to Cm uddhav thackeray about obc reservation)

हे देखील पहा -

या अध्यादेशाबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, ''प्रस्थापितांच्या सरकारला मुळात ओबीसी आरक्षण द्यायचेच नाहीये. हे राज्यपालांना सरकारने या पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध होते. कारण की, माझ्या माहितीप्रमाणे शासनाच्या मुळ प्रस्तावात विधी व न्याय विभागाने स्पष्ट नमूद केले आहे की अध्यादेश काढण्यापूर्वी मा. सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. मला सगळ्या खात्याचे प्रमुख म्हणून मा. मुखमंत्र्यांना हे विचारायचे आहे की त्यांना त्यांच्या शासनात काय घडते याचा खरोखर सुगावा नसतो का? की त्यांना संबंधीत विभागप्रमुखांशी संवाद साधायला वेळ नसतो? किरीटजींना अटक केली जाते हेही त्यांना माहित नसते आणि समस्त ओबीसींच्या राजकीय आस्तित्वाठी आवश्यक असलेला राजयकीय आरक्षणाच्या अध्यादेशाच्या प्रस्तावात त्रुटी आहेत हेही त्यांना माहित नसते का? असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री हतबल आहेत की त्यांनी प्रस्थापितांच्या पुढे... - आ. पडळकर (पहा व्हिडिओ)
कोरोनाशी लढा पण..सहा महिन्यांपासून निधीच खर्च नाही

पुढे ते म्हणाले की, यांच्याच विभागाने यात नकारात्मक भूमिका घेतली असताना यावर कुठलाही उपाय न शोधता या अध्यादेशाचा प्रस्ताव राज्यपालांकडे कोणत्या हेतूने पाठवला जातो? ''मुख्यमंत्री हतबल आहेत की त्यांनी प्रस्थापितांच्या पुढे नांगी टाकलीये? हे बहुजन जनतेला त्यांनी स्वता सांगावे ही मी त्यांना विनंती करतो'' अशी खोचक टीका गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com