Agriculture news in Marathi, Solapur latest marathi news
Agriculture news in Marathi, Solapur latest marathi news अक्षय गुंड
ऍग्रो वन

कांद्यानं रडवलं! सोलापूरच्या शेतकऱ्याला ४० गोणी कांद्याची पट्टी आली वजा ७ रूपये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय गुंड

सोलापूर: कांद्याची आवक अचानक वाढल्याने कांद्याचे भाव प्रचंड घसरले असून शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विकावा लागतोय. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही काढणं शोतकऱ्यांना (Farmers) शक्य होत नाहीये. अंजनगाव खेलोबा (ता.माढा) (Solapur) इथल्या एका शेतकऱ्याला याबाबत खूपच वाईट अनुभव आला आहे. त्याने विकायला नेलेल्या ४० पोती कांद्यासाठी (Onion) त्याला दमडीमोल रक्कम मिळाली, वरुन त्याला ७ रुपये हे आडतवाल्यालाच (कांदा खरेदी करणाऱ्याला) द्यावे लागले आहेत. त्यामुळे कांद्यातून नफा तर सोडाच, पण उत्पादन खर्चही मिळत नाही, शिवाय आपल्याच कांदा विक्रीसाठी आपल्याच खिशातले पैसे या शेतकऱ्याला द्यावे लागले आहेत. अंजनगाव खेलोबा येथील युवा शेतकरी ओंकार पाटेकर यांना या वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. (solapur young farmer facing bad experience because of onion price fall down)

हे देखील पाहा -

राज्यात कांद्याला प्रतिकिलो अवघा १ रुपये भाव मिळत आहे, काही ठिकाणी तर केवळ पन्नास पैसे प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. अंजनगाव खेलोबा येथील युवा शेतकरी ओंकार पाटेकर यांनी ४० पोती कांदा विक्रीसाठी नेला. यावेळी हमाल, आडत खर्च, गाडी भाडे इत्यादी सर्व खर्च वजा करुन त्यांना उत्पादन खर्चही मिळाला नाही. याऊलट आडतवाल्यालाच स्वतःच्या खिशातून ७ रूपये देण्याची नामुष्की या युवा शेतकऱ्यावर ओढवली आहे. ४० पोती असलेला कांदा प्रतिकिलो १ रूपये दराने विकला गेला. त्याची एकूण रक्कम १८८३ रूपये त्यांना मिळाली. पण गाडी खर्च, हमाल खर्च, तोलाई खर्च हे सगळं मिळून १९५४ रुपये झाले. आडतवाल्यालाच ७ रुपये स्वतःच्या खिशातून देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे या युवा शेतकऱ्याली कांद्या रडवलं आहे. (Agriculture news in Marathi)

भाव चांगला म्हणून लावला, पण फसलो! गतवर्षी कांदा उत्पादनातून अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा झाल्याने, यंदा कांद्याची लागवड केली होती. याच भरवश्यावर वर्षभरातील आर्थिक व्यवहाराचे नियोजन केले होते. परंतु कांद्यानेच आमचा वांदे केले असुन, निम्मा नेलेल्या कांद्याची हि अवस्था झाली असुन, आणखी ८० पोती कांदा शेतात पडुन आहे. त्यामुळे कांदा विकुन आणखी तोट्यात जाण्यापेक्षा शेतात सडलेला बरा. अचानक भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांचा विचार करावा.
ओंकार पंकज पाटेकर. - युवा शेतकरी, अंजनगाव खेलोबा

दरम्यान अतिवृष्टी आणि अवकाळीच्या संकटासह महावितरणाच्या लोडशेडिंग आणि खतांच्या दरवाढीचा देखील शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय. एवढं करुनही हाती आलेल्या पिकाला कवडीमोल भाव भेटत आहे. शेतकऱ्यांना लावलेला उत्पादन खर्चही निघणं अवघड झालंय. त्यामुळे याकडे सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: रस्त्यात सापडलेले पैसे उचलणं शुभ की अशुभ?

Today's Gold Silver Rate : सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

Chandrahar Patil: वसंतदादांचे नातू भाजपची बी टीम; पाकीट घेऊन 'मविआ'समोर उभे.. चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांवर प्रहार!

Today's Marathi News Live : श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते डोंबिवलीत दाखल

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

SCROLL FOR NEXT