लालू प्रसाद यादव यांच्या घरासह 17 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी, तपास सुरू

बिहारमधील १७ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली
CBI Raid
CBI Raid Saam Tv
Published On

दिल्ली: सीबीआयने आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित दिल्ली (Delhi) आणि बिहारमधील (Bihar) १७ ठिकाणांवर छापेमारी (Raid) करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये राबडी देवी यांच्या पाटणातील (Patna) शासकीय (Govt) निवासस्थानावर देखील सीबीआयने (CBI) छापा टाकला आहे. मागील २ तासांपूर्वी ही छापेमारी टाकण्यास सुरुवात झाली आहे. पाटणाबरोबरच सीबीआयने दिल्ली (Delhi) आणि इतर शहरांमध्ये देखील एकाच वेळी १७ ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती मिळाली आहे.

हे संपूर्ण प्रकरण लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरतीत (Railway Recruitment) झालेल्या घोटाळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आता सीबीआय अधिकारी राबडी देवी यांची देखील चौकशी करत आहे. सीबीआय अधिकारी खताळ यांचीही चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात लालू यादव यांनी लोकांकडून जमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे. खताळ यांच्या जमिनीबाबत तेच सांगितले जात आहे.

हे देखील पाहा-

लालू यादव राबडी देवी यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव पाटणात नसताना ही छापेमारी करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी तो लंडनला रवाना झाला होता. खुद्द लालू यादव सध्या त्यांची मोठी मुलगी आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी आहेत. पाटणा व्यतिरिक्त बिहारच्या गोपालगंज, दिल्ली आणि भोपाळमध्ये ही छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटणा येथील १०, सर्कुलर रोड येथील निवासस्थानावर सीबीआयचे छापे टाकण्यात आले आहेत.

सकाळी सीबीआयचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले, तेव्हा घरातील लोकांना नीट जाग आली नव्हती. सीबीआय अधिकाऱ्यांनी राबडी देवी यांच्या निवासस्थानी प्रवेश करताच दरवाजे बंद करण्यात आली. यानंतर आतून बाहेरून कोणाला देखील जाण्यास मज्जाव करण्यात आला. छापा सुरू झाल्यावर सुमारे १ तासाने सीबीआयचे अधिकारी राबडी देवी यांच्या घरी पोहोचले. झारखंड क्रमांकाच्या वाहनासह सीबीआय अधिकाऱ्यांना घेऊन जाणारी किमान ३ वाहने राबडी देवी यांच्या निवासस्थानाबाहेर उभी करण्यात आली आहेत. त्यानंतर देखील काही अधिकारी येथे येत आहेत.

CBI Raid
बायको नांदायला येत नाही म्हणून तरूणाचे टाॅवरवर चढून अनोखे आंदोलन

राबडी देवी यांच्या निवासस्थानावर छापेमारीची बातमी समजताच लालू समर्थक आणि आरजेडीचे नेते आणि आमदार त्याठिकाणी आले. येथील वाढती गर्दी बघता बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. घराच्या आत आणि बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लालू यादव यांचे २ वकील देखील घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. राबडी देवी यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले तेज प्रताप यादव यांचे समर्थक कारवाई थांबवा अशा घोषणा देत आहेत. लालू यादव २००४ ते २००९ या काळात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते. यादरम्यान त्यांच्यावर विविध घोटाळे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीबीआय या प्रकरणांचा तपास करत आहे. या प्रकरणांमध्ये याअगोदर देखील छापे टाकण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com