Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance: विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा; प्रति गुंठा ५ रुपये नुकसान भरपाई

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा; प्रति गुंठा ५ रुपये नुकसान भरपाई

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाच दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी (Farmer) शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली आहे. प्रधानमंत्री पीकविमा (Crop Insurance) योजनेंतर्गत राहाता तालुक्यातील केलवड येथील बाबूराव गमे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून एका गुंठ्यामागे चक्क ५ रुपयेप्रमाणे खात्यात रक्कम जमा झाली आहे. यामुळे पीक विमा कंपन्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. (Live Marathi News)

शेतकरी बाबूराव गमे यांनी त्यांच्या सहा एकराहून अधिक क्षेत्रात सोयाबीन (Soybean) पीक घेतले होते. त्यांनी सगळ्या क्षेत्राचा जवळपास तीन हजार रुपये विमा उतरवला होता. अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) केलवड गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. मात्र ज्यावेळी नुकसान भरपाई देण्याची वेळ आली; त्यावेळी विमा कंपन्यांनी बाबुराव गमे यांच्या खात्यावर १ हजार ४०६ रुपये म्हणजे गुंठ्यामागे ५ रुपये प्रमाणे नगण्य रक्कम जमा केली.

नुकसान होऊनही विम्यापासून वंचित

इतर शेतकऱ्यांची असून काहींच्या खात्यात ५, ३८, ४३, ५६, ७०, ९०, १०० ते १३० अशी रक्कम जमा झाली आहे. अनेकांचे नुकसान होऊनही ते विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपन्यांच्या या धोरणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. साम टिव्हीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT