Solapur News
Solapur NewsSaam tv

मुंबईहून चिमुकलीचे अपहरण; विक्रीसाठी नेत असताना महिला सोलापूर रेल्वे पोलिसांच्‍या ताब्यात

मुंबईहून चिमुकलीचे अपहरण; विक्रीसाठी नेत असताना महिला सोलापूर रेल्वे पोलिसांच्‍या ताब्यात
Published on

सोलापूर : मुंबई येथून एक वर्षाच्या बालिकेला विक्रीसाठी घेऊन जाताना सोलापूर रेल्वे पोलिसांनी दोन महिलांना पकडले. अवघ्या 48 तासात मुंबई येथून अपहरण (Kidnapping) झालेल्या एक वर्ष वयाच्‍या बालिकेला सोलापूर (Solapur) रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. (Tajya Batmya)

Solapur News
इंस्टाग्रामवर ओळख..नंतर मैत्री व प्रेम; प्रेमातून तरुणीवर अत्याचार, चोरून काढलेले फोटो केले व्हायरल

हुसेन सागर एक्सप्रेसमधून हैदराबादहून (Mumbai) मुंबईच्या दिशेने येताना हुसेन सागर एक्सप्रेस सोलापूर स्थानक आली होती. सोलापूर रेल्वे पोलिसांना (Railway Police) त्याबद्दल माहिती मिळाली होता. सोलापूर आरपीएफ जवानांनी हुसेन सागर एक्सप्रेस गाडी तपासली असता, जनरल डब्यामध्ये दोन महिला एका बलिकेला घेऊन बसल्या होत्या.

तिकीट चेकींगच्‍या नावाने खाली उतरविले

तिकीट चेक करण्याच्या बहान्‍याने दोन्ही महिलांना खाली उतरवण्यात आली. सदर बालिकेला ताब्यात घेतले. याबाबत मुंबई येथील वांद्रे रेल्वे पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com