- चेतन व्यास
Wardha News : वर्धा जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशीजन्य रोगासह येलो मोजॅकने शेतकऱ्यांच्या हाती आलेला पीक हिरावणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे. (Maharashtra News)
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने 50 हजार रुपये हेक्टरी मदत करा या मागणीसाठी आज वर्धेत सरपंच संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलीय. यावेळी सरपंचानी आपल्या हातात खराब झालेले सोयाबीनचे झाड घेऊन शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडलीय.
वर्धेच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सोयाबीन पिकावर झालेल्या बुरशीजन्य रोगाचा व येलो मोजॅकच्या हल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून तातडीने 50 हजार हेक्टरी मदत करावी यासाह नुकसानीचा पीक विमा योजनेत सहभाग करावा अशीही मागणी यावेळी सरपंचांनी केली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.