Carrot saam tv
ऍग्रो वन

Carrot: गाजराची फॅक्टरी असलेले गाव..संक्रांतीच्या तोंडावर भाव वधारले

गाजराची फॅक्टरी असलेले गाव...संक्रांतीच्या तोंडावर भाव वधारले

विजय पाटील

सांगली : सांगलीतील कवलापूर गाव तसे द्राक्ष उत्पादकाचे गाव आहे. परंतु गेल्या काही काळापासून इथे गाजराचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ते ही देशी आणि सेंद्रिय गाजराची शेती केली जाते. एक प्रकारे देशी आणि सेंद्रिय गाजराची (Organic carrot) फॅक्टरीच या कवलापूरात बनली आहे. (sangli news Village with carrot factory Prices have gone up on the eve of Sankranti)

कर्करोग (Cancer), मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर उपयुक्त ठरते ते म्हणजे गाजर. डोळ्याच्या आजारावर देखील गाजर उपयुक्त आहे. गावचे सवाळ पाणी हेच या गावातील गाजराच्या चविष्ठपणमागचे प्रमुख कारण आहे. आज कवलापूरच्या चविष्ट गाजराना महाराष्ट्रतील (Maharashtra) अनेक शहरासह कर्नाटकात (Karnataka) देखील मोठी मागणी आहे. मकरसंक्राती सणाच्या पंधरवड्यात या गाजराचे दर वाढतात. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकरी (Farmer) गाजर पिकाखालील क्षेत्रात वाढ करत आहेत.

स्‍वतः पोहचतात मार्केटपर्यंत

तीन महिन्यात विक्रीस येणाऱ्या गाजर शेतीत काढणीपासून ते विक्रीपर्यत अनेक प्रकिया आहेत. गावातीलच मंडळी गाजर मार्केटपर्यत पोचवतात. यामुळे देशी आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या गाजराची कवलापूर मध्ये एकप्रकारे फॅक्टरीच उभारली आहे.

गावातच सारी यंत्रणा

कवलापूरमधील या बहुगुणी गाजराची शेती प्रसिद्ध आहे. आज द्राक्षाबरोबरच कवलापूरमध्ये गाजर शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतात गाजर लावण्यापासून ते तीन महिन्यांनंतर हे गाजर काढून ते स्वच्छ धुवुन बाजारात विक्रीस पाठवण्यापर्यतची सगळी यंत्रणा गावातच आहे. गाजर धुण्यासाठी तर गावात पाण्याचे मोठे टॅंक बनवले गेलेत. रोलरमध्ये गाजरे टाकून ती स्वच्छ धुतली जातात.

गाजराचा भाव वधारला

तोंडावर आलेल्या मकरसंक्रांती सणासाठी गाजराना मोठी मागणी असते. यामुळे या काळात गाजराचा भाव चांगलाच वधारतो. यंदा सध्या गाजराचा दर किलोला २२ ते २३ पर्यत गेला असून पुढच्या दोन तीन दिवसात हा दर आणखीन वाढण्याची देखील शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खासदार संजय राऊत आज अहिल्यानगर दौऱ्यावर

भंडारदऱ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, १५ ते १७ ऑगस्टदरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?|VIDEO

Kurla To Vengurla: गावतल्या मुलांची लग्न का नाही होतं? 'कुर्ला टू वेंगुर्ला' चित्रपटात उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट

Shukra Surya Yuti: शुक्राच्या राशीत बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या प्रत्येक इच्छा होणार पूर्ण

Saputara Hill Station: मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय हे अप्रतिम हिल स्टेशन, पर्यटकांसाठी सर्वोत्तम अनुभव

SCROLL FOR NEXT