सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील झेंडूची फुले उत्पादन शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुंबईसह अन्य बाजारात फुलांना दर मिळत नसल्यामुळे झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
तासगाव (Tasgaon) तालुक्यातील अनेक गावात झेंडू फुलांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातून ही फुले दररोज मुंबई व अन्य मार्केटमध्ये पाठविली जातात. नुकताच झालेल्या दसरा सणांमध्ये फुलांना चांगला भाव मिळाला होता. यामुळे उत्पादक आनंदी होते. मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. मागील आठ दिवसांपासून बाजारात झेंडूच्या फुलांचे दर गडगडले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघेना अशी (Farmer) शेतकऱ्यांची अवस्था आहे.
झेंडू रोपे लागन केल्यापासून तालुक्यात पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक सुरवातीपासूनच संकटात होते. औषधे फवारणी केली जात होती. खतांवर आणि मजुरांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. यामधून चांगला आर्थिक लाभ मिळेल; अशी आशा उत्पादकांना होती. मात्र मागील आठ दिवसांपासून बाजारात झेंडू फुलांचे भाव पडले आहेत. दसऱ्याला प्रती किलो १०० रूपयेपेक्षा जास्त भाव असणाऱ्या फुलांना १० ते १५ रूपये प्रती किलो भाव मिळत आहे. मात्र मागील आठ दिवसांपासून बाजारात झेंडूच्या फुलांना दर मिळत नसल्यामुळे फुले शेतात किंवा मार्केटमध्ये गेल्यावर फेकून द्यावी लागत आहेत. उत्पादन खर्च सुद्धा निघेना. यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.