Grapes Farming Saam tv
ऍग्रो वन

Grapes Farming : चांगला दर असल्याने द्राक्ष विक्रीकडे कल; बेदाणा उत्पादनात होणार घट, दरही वाढण्याची शक्यता

Sangli News : मध्यंतरी वातावरणातील झालेल्या बदलाचा परिणाम द्राक्ष बागांवर झाल्याचे पाहण्यास मिळत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे आवक कमी असल्याने द्राक्षाला चांगला भाव मिळत आहे

विजय पाटील

सांगली : यंदाच्या बेदाणा हंगाम सुरू झाला आहे. मात्र द्राक्ष उत्पादनात झालेली घट आणि द्राक्षाला मिळणार चांगला दर त्यामुळे द्राक्ष बाजारात विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादन २० टक्के होऊन अधिक घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज बेदाणा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. तर बेदाण्यास यंदाही दर वाढण्याच्या शक्यतेने बेदाणा उत्पादक शेतकरी सुखावले आहेत.

नाशिक व सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सांगली जिल्ह्यात द्राक्ष लागवड झाली आहे. मात्र मध्यंतरी वातावरणातील झालेल्या बदलाचा परिणाम द्राक्ष बागांवर झाल्याचे पाहण्यास मिळत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अर्थात आवक कमी असल्याने द्राक्षाला चांगला भाव मिळत आहे. यामुळे जिल्ह्यात बेदाणा उत्पादन कमी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. 

बेदाणा दरातही तेजी 

गेल्या तीन ते चार वर्षांपैकी यंदा प्रथमच द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेत चांगले वातावरण तयार झाले आहे. द्राक्ष उत्पादन सरासरी ३० ते ४० टक्के घटल्याने दर वाढले आहेत. तर दुसरीकडे द्राक्षाचे उत्पादन कमी असल्याने बेदाण्याचे उत्पादन घटण्याच्या शक्यतेने बेदाण्याच्या दरात ही तेजी राहण्याचे चित्र दिसत आहे. यंदा पावसामुळे सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांसाठी द्राक्ष शेती तोट्याची ठरले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची द्राक्ष शिल्लक राहिली त्यांच्यासाठी हा हंगाम मदतीचा हात देणारा ठरणार आहे.

शेतकऱ्यांचा द्राक्ष विक्रीकडे कल 

सध्या जत, सोलापूर, कर्नाटक या भागातील बेदाणा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे. महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादनात घट झाली असली तरी कर्नाटकात वाढलेले द्राक्ष क्षेत्र आणि यंदा उत्पादनात झालेली घट याचा अंदाज व्यापारी घेत आहेत. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष विक्रीकडे कल वाढताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Flood : माढ्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त; सीना नदीच्या महापुरात नुकसान

Paracetamol safety: गरोदर महिलांसाठी पॅरासिटोमोल किती सुरक्षित? WHO आणि AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Death : क्रीडा विश्वावर शोककळा; स्टार खेळाडूचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन, मॅचदरम्यान झाली होती दुखापत

शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार? PM मोदी आणि CM फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली? VIDEO

Supreme Court : पालकांचा सांभाळ करत नसाल तर संपत्तीतून होणार बेदखल; काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT