Sangli News
Sangli News Saam Tv
ऍग्रो वन

द्राक्ष बागायतदारांची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

विजय पाटील

सांगली - जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील तिघा द्राक्ष बागायतदारांचे तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाळवा येथील व्यापारी पिता पुत्रावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील नजीर मेहबूब मुजावर, मुलगा जमीरअशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. हा फसवणुकीचा प्रकार एक वर्षापूर्वी घडला होता. या प्रकरणी राहुल रघुनाथ माळी राहणार रेठरेहरणाक्ष यांनी फिर्याद दिली आहे.

हे देखील पाहा -

11 मार्च 2019 रोजी जमीर व त्यांचे वडील नजीर हे रेठरे हरणाक्ष येथे राहुल माळी यांची द्राक्ष बाग बघण्यासाठी गेले होते. दोन लाख रुपयात बागेतील द्राक्ष घेण्याचा व्यवहार ठरला होता. त्यानंतर राहुल यांचा चुलत भाऊ प्रवीण माळी यांची बाग तीन लाख रुपयांनी ठरले होते. तर दुसरा चुलत भाऊ स्वप्निल माळी यांची बाग अडीच लाख रुपये ठरली होती. 12 मार्च ते 17 मार्च या कालावधीत जमीर आणि नजीर हे वाळवा इथून मजूर घेऊन आले आणि त्यांच्या बागेतील द्राक्षे घेऊन गेले.

तिघांना महाराष्ट्र बँकेचे पाच लाख 30 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. राहिलेले पैसे रोख देतो असे सांगितले होते. द्राक्ष बागातदार राहुल आणि त्यांचे भाऊ बँकेत धनादेश घेऊन गेले. त्यावेळी व्यापाऱ्याच्या खात्यावर पैसे नसल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क साधला असता तुमचे पैसे देत नाही तुम्हाला काही करायचे ते करा अशी धमकी त्यांनी दिली.

त्यानंतर माळी यांनी पैशासाठी तगादा लावला असता जमीर यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा

Gauri Nalawade: माळरानी यावं गुलाबाचं फूल, गौरीच्या रुपाची पडली भूल!

Navi Mumbai Crime News: कंत्राटदाराने केली सहकाऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Relationship Tips : डेट करणाऱ्या मुलीशी चॅटवर बोलताना 'ही' काळजी घ्या; प्रेमाचं नातं आणखी बहरेल

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ट्राय करा 'हे' Home Remedies

SCROLL FOR NEXT