Sambhajinagar News Saam tv
ऍग्रो वन

Sambhajinagar News : टँकरने पाणी आणून जगवताहेत बागा; उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Sambhajinagar news : संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाणी संकट निर्माण झाले आहे. पाण्याचे संकट अधिक गडद होत चालले असून उन्हाच्या तीव्रतेत फळबागा जागविण्याचे आव्हान

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. वाढत्या उन्हाचा फटका आता फळबागांना देखील बसत आहे. त्यामुळे फळबागांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी झाडावर साड्यांचे आच्छादन करीत फळबागा वाचवण्यासाठी धडपड करत आहे. तर काही ठिकाणी टँकरद्वारे या झाडांना पाणी घालण्याची वेळ शेतकऱ्यावर येत आहे. 

संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाणी संकट निर्माण झाले आहे. पाण्याचे संकट अधिक गडद होत चालले असून उन्हाच्या तीव्रतेत फळबागा जागविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शेतातील पीक कसे जगवायचे हा देखील मोठा प्रश्न आहे. तरी देखील शेतकरी (Farmer) टँकरद्वारे पाणी आणून फळबागांमधील झाडांना देत आहे. 

आच्छादनाचा खर्च वाढला 

नागरिकांना देखील पिण्यासाठी पाणी लवकर मिळत नसल्याने आता या फळबागा वाचवायच्या तरी कशा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता आणि पाण्याचे बाष्पीभवन थोपवून ठेवण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी भुसा आणि साड्या टाकून हे आच्छादन केले आहे. दरम्यान उत्पन्नापेक्षा या बागा जोपासण्यात अधिक खर्च येत असल्याचे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT