Shreya Maskar
पालकांनो मुलं चुका करतात आणि तुम्ही त्यांना ओरडता, मात्र याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे मुलांना सहसा ओरडणे टाळा आणि जरी कधी ओरडला तर ओरडल्यानंतर ही चूक करू नका.
मुलाला ओरडल्यानंतर पालक जी सर्वात मोठी चूक करतात, ती म्हणजे त्यांच्यातील तुटलेला भावनिक दुवा पुन्हा न जोडणे. म्हणजे पालक मुलांना ओरडल्यावर त्यांच्याशी बोलणे बंद करतात, त्यांना समजावून सांगत नाही. अबोला धरतात.
मुलांना कितीही ओडलात तरी त्यांच्यासोबत पुन्हा संवाद साधा, प्रेमाने जवळ घ्या. त्यांचा दृष्टिकोन देखील समजून घ्या.
कधी काळी पालकांची देखील चूक असू शकते, अशा वेळी पालक माफी मागणे याऐवजी, अनेकदा पालक असे वागतात की, जणू काही घडलेच नाही किंवा ते मनात राग धरून ठेवतात. चुकीला मुलालाच जबाबदार धरतात.
पालकांच्या या ऐका चुकीमुळे मुलांच्या मनात भीतीची भावना तयार होते. कठोरपणे ओरडल्यामुळे मुलाच्या मेंदूला धोक्याची जाणीव होते. जर परिस्थिती प्रेमाने सावरली नाही, तर मूल तणावाच्या स्थितीतच राहतात.
मुलं असा देखील विचार करतात माझ्याकडू चूक झाली म्हणजे मी वाईट आहे. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मानाला हानी पोहचते, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.
तुमच्या मुलाने चुकी केली असली तरी ओरडण्यापेक्षा शांतीचा मार्ग वापरा. मुलांना चांगले काय, वाईट काय यातील फरक समजवून सांगा. मुलांना एकट न वाटता, तुम्ही त्यांच्यासोबत आहात ही भावना जाणवून द्या.
मुलांच्या आवडीच्या गोष्टी करा. त्यांना प्रेमाने जवळ घ्या. मिठी मारा. त्यांच्याशी गप्पा मारा. तुम्ही वैतागलेले असतानाही तुमचे त्यांच्यावरील प्रेम कधीच कमी होत नाही, याची त्यांना खात्री पटू द्या.