Parenting Tips : तुमचं मुल तासनतास सोशल मीडियावर असते? 'या' गोष्टींची घ्या खबरदारी, नाहीतर भविष्य बिघडेल

Shreya Maskar

मर्यादा निश्चित करा

मुलांना सोशल मीडियाच्या वापरासाठी एक ठराविक वेळ आणि मर्यादा निश्चित करून द्या. एकूण स्क्रीन टाइम मर्यादित करण्यासाठी डिव्हाइसमधील मॉनिटर्स किंवा ॲप्लिकेशन ट्रॅकर्सचा वापर करा.

Set Limits | pinterest

मोबाईल दूर ठेवा

तुम्ही जर एकत्र कौटुंबिक वेळ घालवत असाल, जेवण करत असाल , रात्री झोपत असाल तर फोन आणि टॅब्लेट बेडरूममधून आणि जेवणाच्या टेबलापासून दूर ठेवा.

Keep Mobile Devices Away | pinterest

झोपेची वेळ निश्चित करा

रात्री उशिरा स्क्रोलिंगची सवय टाळण्यासाठी झोपण्याच्या किमान एक तास आधी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा. तसेच मुलांना झोपण्याची वेळ ठरवून द्या.

Bedtime | pinterest

छंद जोपासा

मोबाईल आणि सोशल मीडियापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना इतर गोष्टींची आवड लावा. त्यांना त्यांचे छंद जोपासण्यास प्रोत्साहन करा. उदा. कला, खेळ

Encourage Hobbies | pinterest

स्वतःची वागणूक बदला

पालकांनो, तुम्ही देखील मुलांसमोर मोबाईलचा कमी वापर करा. मुलांसमोर स्वतःच्या डिव्हाइसचा आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा, कारण मुले मोठ्यांच्या वागणुकीचे अनुकरण करतात.

Behavior | pinterest

पॅरेंटल कंट्रोल्स

सोशल मीडियावरील पॅरेंटल कंट्रोल्समध्ये अॅपमधील सेटिंग्ज (वेळेची मर्यादा, प्रायव्हसी डिफॉल्ट्स) आणि मॉनिटरिंग टूल्स यांचा समावेश असतो. ही वैशिष्ट्ये हानिकारक सामग्री ब्लॉक करण्यास, अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या थेट संदेशांवर निर्बंध घालण्यास आणि दररोजच्या स्क्रीन टाइमचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात.

Parental Controls | pinterest

संवाद साधा

पालकांनो मुलांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. असे वातावरण तयार करा जिथे मुलांना ऑनलाइन नकारात्मक गोष्टींबद्दल मोकळेपणाने तक्रार करता येईल.

Communicate | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : मुलं डाळ-भाजी पाहताच नाक मुरडतात? पालकांनो! एकदा फॉलो करा 'या' ट्रिक्स, ५ दिवसांत सवय बदलेल

Parenting Tips | saam tv
येथे क्लिक करा...