Sambhajinagar news Saam tv
ऍग्रो वन

E Crop Survey : शेतकऱ्यांना ई पीक पाहणी आवश्यक; नोंदणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

Sambhajinagar news : शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई पीक पाहण्याची प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शेतात लागवड केलेल्या पिकांनी माहिती सरकारपर्यंत जाण्यासाठी ई पीक पाहणी यंत्रणा सुरु काण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. कारण हि नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ मिळू शकणार आहे. यासाठी या नोंदणीला १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येत आहे. 

शेतकऱ्याने (farmer) आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई पीक पाहण्याची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यंदा पिक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विमा पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली आहे. याची नोंदणी केल्यास शेतकऱ्याला (Sambhajinagar) पीक नुकसान अन्य काही सरकारी मदत असो याचा लाभ मिळू शकणार आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही; त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणे कठीण आहे. 

१५ सप्टेंबरपर्यंत मुदत 

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी यंत्रणेवर नोंदणी करण्यास १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून शेतकऱ्यांना या कालावधीत नोंदणी करता येईल. त्यामुळं सर्वांनी मुदतीच्या आत पीक पाहणी करावी असं आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT