Bhandara News : खुर्शीपार बांध तलावाचा कॅनल फुटला; हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, पिकांचे नुकसान

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सालेभाटाकडे जाणारा कॅनल पूर्ण भरला होता
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील ८ किमी अंतरावर असलेल्या परसोडी, सालेभाटा, शिंदीपार व मुंडीपार शेतशिवारात खुर्शीपार बांध येथील जाणारा कॅनल फुटला. यामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतातील धान लागवडीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Bhandara News
Corona Positive : सावधान कोरोना परतला; संभाजीनगरात ७ रुग्ण बाधित, महापालिका सतर्क

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या (Rain) पावसामुळे सालेभाटाकडे जाणारा कॅनल पूर्ण भरला होता. कॅनालमध्ये पाणी अधिक झाल्याने शेता शेजारील कॅनल फुटून या कॅनलचे पाणी परसोडी, सालेभाटा शिंदीपार व मुंडीपार शेतशिवारात शिरले. यामुळे शेताला भगदाड पडल्याने यात शेताचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच शेतात पिकवलेला शेतमाल यात नष्ट झाला आहे. शेतातच भगदाड पडल्यामुळे भविष्यात या जमिनीवर शेती करणे अशक्य झाले आहे. या नुकसाणीसाठी पाटबंधारे विभाग जबाबदार असून त्यांनी शेती दुरुस्त करून द्यावी अशी पिडीत (Farmer) शेतकऱ्यांची मागणी आहे.

Bhandara News
Nandurbar News : नंदुरबार शहरवासीयांना पाण्याच्या प्रश्न मिटणार; पाणी टंचाई दूर करण्यासाठी २०० कोटी रुपयांची योजना

लाखनी तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायत हद्दीत येणारा खुर्शीपार येथील जंगलात तलावाची निर्मिती तयार केले असून तलावाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे; या हेतूने १९८३ साली सालेभाटाकडे जाणारे कॅनल तयार करण्यात आले आहे. याचे सनियंत्रण, देखरेख दुरुस्तीची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असली तरी ४० वर्ष पूर्ण झालेल्या कॅनलचे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. असे लाभार्थी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत पिडीत शेतकऱ्याने वारंवार सहाय्यक अभियंता यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले असता त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने सदर कॅनल पांढरा हत्ती ठरत असल्याने पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती उदासीन आहे हे दिसून येते. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com