Tur Price : तुरीच्या दरात घसरण; ११ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षाही खाली घसरले दर

Washim News : गतवर्षीच्या हंगामात उत्पादित तुरीला चांगले दर मिळत असल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुरीच्या पेरणीवर अधिक भर दिला आहे
Washim News
Washim NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: काही दिवसांपर्यंत १२ हजारांच्या जवळपास असलेल्या तुरीच्या दरात घसरण होत आहे. हे दर आता थेट ११ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षाही खाली घसरले आहेत. यात वाशिम बाजार समितीत तुरीला कमाल १० हजार ८५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर कारंजा बाजार समितीत कमाल १० हजार ८०५ रुपये प्रति क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले.

Washim News
Nandurbar News : नंदुरबार शहरवासीयांना पाण्याच्या प्रश्न मिटणार; पाणी टंचाई दूर करण्यासाठी २०० कोटी रुपयांची योजना

गतवर्षीच्या हंगामात उत्पादित तुरीला चांगले दर मिळत असल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुरीच्या पेरणीवर अधिक भर दिला आहे. यंदाच्या खरीप हंगामात (Washim News) वाशीम जिल्ह्यात जवळपास ६३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात तुरीची पेरणी केली आहे. अद्याप, तुरीचे पीक हाती येण्यास दोन ते अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळ लागणार आहे.अशातच आताच तुरीच्या दरात घसरण होत असल्याने तुरीची पेरणी केलेल्या (Farmer) शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Washim News
Bhandara News : खुर्शीपार बांध तलावाचा कॅनल फुटला; हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, पिकांचे नुकसान

भाव वाढीच्या अपेक्षेने साठवणूक 

शेतकऱ्यांनी मागील वर्षी तुरीचे उत्पादन घेतल्यानंतर सुरवातीला तुरीचे दर कमी होते. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी घरात साठवणूक केली होती. यानंतर (Bajar samiti) बाजार समितीमध्ये तुरीचे दर १२ हजाराच्या वर पोहचले होते. यानंतर देखील आणखी भाव वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याने त्यांनी तूर विक्रीस काढली नाही. आता दरामध्ये घसरण होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com