रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. पीक विमा काढण्याची मुदत संपली असून संभाजीनगर जिल्ह्यातील ९ लाखांवर शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित केली आहेत. खरीप हंगामासाठी ९ लाख १० हजार ८३८ रुपयांचा भरणा कंपनीकडे केला आहे.
अतिवृष्टी रोगराईसह इतर नैसर्गिक आपत्ती मधून पिकांचे नुकसान झाले; तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी प्रधानमंत्री (Crop Insurance) पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना पिकांचा विमा काढण्यासाठी ७००, १ हजार आणि २ हजार रुपयांचा खर्च हा प्रती हेक्टरसाठी येत होता. मात्र या योजनेत नव्याने बदल करण्यात आला असून आता केवळ १ रुपयात पिक विमा काढता येत आहे. यामुळे (Farmer) शेतकऱ्यांसाठी १ रुपयात आपले शेतातील पिके संरक्षित करता येणार आहेत.
संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील नऊ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला असून यात ९ लाख १० हजार ८३८ रुपयांचा विमा भरणा करून यंदाच्या खरीप हंगामातील आपली पिके संरक्षित केली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात ५ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, मका, कापूस, तूर, उडीद यासारख्या खरीप पिकांची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.