Sambhajinagar News Saam tv
ऍग्रो वन

Brinjal Price : वांग्याच्या दरात प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत घसरण; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने वांगे फेकले बांधावर

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील जळकी गावातील बालाजी बदर या शेतकऱ्याने रस्त्यावर वांगे टाकून निषेध केला

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र बाजारात आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातच वांग्याला १० रुपये किलोचा दर देखील मिळत नसल्याने वाहतूक खर्चही निघेना. तसेच व्यापारी घेण्यासाठीही तयार नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने वांग्यांची तोडणी करत वांगे फेकून दिले आहेत. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील जळकी गावातील बालाजी बदर या शेतकऱ्याने रस्त्यावर वांगे टाकून निषेध केला. सिल्लोडच्या आठवडी बाजारासाठी तालुक्यातील शेतकरी आपला भाजीपाला घेऊन बाजारात येतात. मकरसंक्रांतीचा बाजार असल्याने भाजीपाल्याला चांगला दर मिळेल; अशी आशा वांगे उत्पादक शेतकऱ्यांना होती. पण उलटेच घडले. 

प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत घसरण 

सिल्लोड तालुक्यात १४०० हेक्टर भाजीपाल्याची लागवड झालेली आहे. मध्यंतरी भाजीपाल्यावर पडलेल्या रोगराईमुळे शेतकऱ्यांना मोठा खर्च करून रोगराई आटोक्यात आणावी लागली. आता दोन पैसे हाती येतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. अशातच बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरल्याचे दिसून येत आहे. वांगे व कोबीच्या दरात साधारण ५० ते ७० रुपयांपर्यंत दराची घसरण झाली आहे.  

वांगी दिली फेकून 

बाजारात मागच्या आठवड्यात मिळालेला दर देखील भाजीपाल्याला मिळाला नाही. कवडीमोल दराने अनेकांनी भाजीपाल्याची विक्री केली. विशेष म्हणजे या बाजारात वांगी ५० तर कोबीचे दर ७० रुपये प्रतिकिलोने घसरल्याचे दिसून आले. अनेकांनी भाजीपाला टाकून दिला आहे. जळकी गावातील बालाजी बदर या शेतकऱ्याने अर्धा एकरात वांगे लावले होते. वांग्याचे भाव कोसळल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने वांगी तोडून फेकून दिली. यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT