भारत मसाल्यांसाठी ओळखला जातो. भारतात पिकवल्या जाणाऱ्या मसाल्याची मागणी परदेशातही आहे. पण आज आपण ज्या मसाल्याबद्दल बोलत आहोत त्याला पृथ्वीचं सोनं म्हटलं जातं. मसाल्याचा हा पदार्थ सर्वात महाग दरात विकाला जातो. हा मसाल्याचा पदार्थ आहे 'केशर'. केशरच्या सर्वोत्तम जातीची दर ५ लाख रुपये प्रति किलोपर्यंतचे आहेत.(Latest News)
केशराची शेती प्रामुख्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्येच केली जाते. कारण केशर लागवडीसाठी कमी तापमान लागते. परंतु तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केशराची लागवड सध्या उष्ण प्रदेशातही केली जात आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी केशराची लागवड करून चांगले उत्पन्नही मिळवत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जगातील सर्वात महागड्या मसाल्याची शेती तुम्ही घरी करू शकता. केशराची लागवड विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट वातावरणातच केली जाते. त्यामुळे त्याची किंमत इतकी जास्त आहे. बडगाम, काश्मीरमध्ये आढळणारे केशर सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे त्याची किंमत ५ लाख रुपये प्रतिकिलोपर्यंतची आहे.
घरातही करता येणार शेती
घराच्या एका खोलीतही तुम्ही केशराची लागवड करू शकता. यासाठी खोलीचे तापमान काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील तापमानासारखे लागते. हे तापमान तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रित करता येते. ज्या खोलीत तुम्हाला केशर पिकावयचे आहेत. त्या खोलीत तुम्हाला एरोपोनिक तंत्र वापरून रचना तयार करावी लागेल. जेथे हवेचीही योग्य व्यवस्था करावी लागेल. केशर लागवडीसाठी दिवसा खोलीचे तापमान १७ अंश सेल्सिअस ठेवणे महत्वाचे आहे. रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअस असावे. यासोबतच तुम्हाला खोलीतील आर्द्रतेकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल.
या गोष्टींची काळजी घ्या
खोलीची आर्द्रता (ह्यूमिडिटी) ८०- ९० अंश असावी.
एरोपोनिक स्ट्रक्चर तयार केल्यानंतर, तुम्हाला माती भूसभुसीत करून घ्यावी लागेल.
माती वालुकामय, चिकणमाती असावी लागते.
माती टाकताना त्यात पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
पाणी साचून राहिल्याने केसरची झाडे खराब होत असतात.
केशर लागवडीसाठी फक्त हलक्या पद्धतीचे सिंचन आवश्यक आहे.
केशराच्या चांगल्या उत्पादनासाठी जमिनीत फॉस्फरस, पोटॅश नत्र, शेणखत यांचा वापर करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.