sadabhau khot, solapur, farmers.
sadabhau khot, solapur, farmers. saam tv
ऍग्रो वन

हजारो हेक्टर केळीची शेती भुईसपाट; सदाभाऊ खोतांनी शेतक-यांना दिला दिलासा

विश्वभूषण लिमये

साेलापूर : माढा (madha) तालुक्यातील टेंभुर्णी (tembhurni) परिसरातील कोंढार भागातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे (rain) केळी, डाळींब, आंबा, मका व इतर फळबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे येथील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात सापडला आहे. या शेतक-यांच्या (farmer) शेतात जाऊन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी नुकसानीची पाहणी करीत सरकारकडे मदतीची मागणी करु असे आश्वासन दिले. (sadabhau khot latest marathi news)

कोंढार भागातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतक-यांचे नुकसान झाल्याची माहिती खाेत यांना मिळाली हाेती. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा खोत यांनी चांदज गावातील युवराज तांबवे यांच्या केळीच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. तीव्र वादळामुळे केळीच्या पिकाचं मोठे नुकसान झालेले आहे. पण याची साधी दखल घ्यायला कृषी विभागाचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार कोणीही फिरकले सुद्धा नाहीत.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आलेल्या वादळी वारे व पावसामुळे कोंढार भागातील हजारो हेक्टर केळीची शेती भुईसपाट झाली आहे. त्याचबरोबर माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील कोंढारभागातील रांझणी, नगोली, गारअकुले, आढेगाव, आलेगाव, बुद्रुक, आलेगाव खुर्द, वडोली या गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखापेक्षा जास्त रुपयाची मदत करावी, चालू पीक कर्ज माफ करावे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी खोत यांनी सरकारकडे केली जाईल अशी ग्वाही शेतक-यांना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sobhita Dhulipala : अभिनेत्री शोभिता धुलिपाला पडली प्रेमात? नागा चैतन्यसोबतच्या डेटिंगबद्दल केला मोठा खुलासा

Malshejh Ghat Accident News: माळशेज घाटात भीषण अपघात! दूध टँकर आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई! अनेक गावातील अवस्था अत्यंत बिकट

Onion Price Hike: शेतकऱ्यांना अच्छे दिन! निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वधारले; प्रतिक्विंटल मिळतोय इतका दर

Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

SCROLL FOR NEXT