Jee Main 2022 : जेईई मुख्य परीक्षेसाठी नव्या तारखा जाहीर; असे करा प्रवेशपत्र डाउनलाेड

जेईई मुख्य परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यंदाही परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यावेळी परीक्षेच्या तारखा अनेकवेळा बदलण्यात आल्या आहेत. पहिली परीक्षा एप्रिलमध्ये होणार होती, त्यानंतर ती मेपर्यंत वाढवण्यात आली आणि त्यानंतर जूनच्या तारखाही बदलण्यात आल्या.
JEE Main 2022 Exam Date, JEE Main Exam 2022 News Updates
JEE Main 2022 Exam Date, JEE Main Exam 2022 News Updatessaam tv
Published On

नवी दिल्ली (JEE Mains Exam Postponed) : जेईई मुख्य परीक्षचे (JEE Mains Exam) पहिले सत्र आता 20 जूनऐवजी 23 जूनपासून सुरू होणार आहे. यंदा पहिले सत्र 29 जूनपर्यंत चालेल अशी माहिती एनटीएने (National Testing Agency) विद्यार्थ्यांपर्यंत (student) त्यांच्या संकेतस्थळावरुन पाेहचवली आहे. (jee main) परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे आणि कोणत्या तारखेला विद्यार्थ्यांना परीक्षा (exam) द्यायची आहे, याची माहिती देखील सूचनेत नमूद करण्यात आली आहे. (JEE Mains Exam Postponed Latest Marathi News)

परीक्षेचे स्लॉट आणि परीक्षा केंद्राचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. प्रवेशपत्रे अद्याप अद्यावत केलेली नाहीत. आज किंवा 17 जून पर्यंत प्रवेशपत्र मिळू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. (JEE Main 2022 Exam Date)

JEE Main 2022 Exam Date, JEE Main Exam 2022 News Updates
Prophet Remark Row : नुपूर शर्माच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

दरम्यान परीक्षा सत्राचे दिवस कमी केल्यामुळे २० ऐवजी केवळ १४ स्लॉट शिल्लक आहेत. परीक्षा एका दिवसात दोन स्लॉटमध्ये होईल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी हे सत्र 20 ते 29 जून या कालावधीत होणार होते.

JEE Main 2022 Exam Date, JEE Main Exam 2022 News Updates
हाॅस्टेलमध्ये माधूरीने गळफास घेऊन केली आत्महत्या; टोपले कुटुंबिय शाेकसागरात

जेईई मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज दिले जाऊ शकते अशी शक्यता आहे. परीक्षेसाठी वर्गात जाताना विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र बंधनकारक आहे. NTA लवकरच प्रवेशपत्र देईल. विद्यार्थ्यांना NTA च्या अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in येथे जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

JEE Main 2022 Exam Date, JEE Main Exam 2022 News Updates
Monsoon Updates : मान्सूनचे महाराष्ट्रात कधी होणार आगमन?; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

JEE मुख्य प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी nta.ac.in च्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.

होमपेजवर Admit Card अशी लिंक असेल.

तेथे तपशील भरा.

आता तुम्हाला स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसेल.

प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Edited By : Siddharth Latkar

JEE Main 2022 Exam Date, JEE Main Exam 2022 News Updates
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com