Sangli, jowar saam tv
ऍग्रो वन

Sangli : काय सांगता ! 'या' ज्वारीला मिळताेय तीनशे रुपये प्रति किलो दर

एकमेव चव हा गुण हुरडा ज्वारीचे आहे. गोड आणि मधाळ हे याचे वैशिष्ट्य आहे.

विजय पाटील

Sangli : मिरज (miraj) तालुक्यातील बेडग येथील शेतकरी (farmer) तानाजी विठ्ठल नलावडे गेल्या तीन वर्षांपासून 'हुरडा' ज्वारीचे (hurda jowar) उत्पादन घेतात. तब्बल तीनशे रुपये किलो दराने त्यांच्या या हुरडा ज्वारीला दर मिळत आहे. सांगली (sangli) शहरासह जिल्ह्यात हुरडा ज्वारीला चांगली मागणी वाढली आहे.

ज्वारी हा प्रत्येकाच्या घरातील रोजच्या जेवणातील एक आवडता पदार्थ. ज्वारी पासून भाकरी बनते, जी पौष्टिक म्हणून समजली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारामध्ये ज्वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्वारीची किंमत बाजारात साधारणपणे वीस रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत फार तर पन्नास रुपये किलो इतकीे. परंतु नलावडे यांच्या 'हुरडा' ज्वारीस तीनशे रुपये प्रति किलाे असा दर मिळत आहे.

यावर नलवडे म्हणाले सेंद्रिय शेती लोकांना कळावी हा आपला हेतू आहे. त्यातून 'हुरडा' ज्वारीचे बियाणे आणण्यासाठी औरंगाबादपर्यंत आपण जाऊन आलो. मात्र त्यावेळी तिथे मिळाले नाही, योगायोगाने सांगलीत उपलब्ध झाले. पण एक किलो हुरडा ज्वारीची किंमत खूपच अधिक होती. तरीही आपण घेतली आणि त्यातून त्याचा पीक घेऊन ते वाढविण्यास सुरुवात केली. (Maharashtra News)

आता त्याला चांगली मागणी देखील आली आहे. हुरडा ज्वारीला तीनशे रुपये दर मिळतो. कारण त्याची चव रेग्युलर ज्वारीपेक्षा वेगळी आहे. शहरातले जे लोक चवीने खातात ते या हुरडा ज्वारीला अधिक पसंती देतात आणि एकमेव चव हा गुण हुरडा ज्वारीचे आहे. गोड आणि मधाळ हे याचे वैशिष्ट्य आहे.

सांगली शहरात घरपोच तीनशे रुपये किलो दराने आम्ही हुरडा ज्वारी देतो. त्याच बरोबर गूळ देखील देतो. तर सेंद्रिय शेती कळावी म्हणून शेतात हुरडा पार्टी ऊसाच्या शेतावर करावी लागते. त्यामुळे त्याचा चारेश रुपये दर आहे. इतर शाळू आणि हुरडा ज्वारीमध्ये चवीचे असणारा फरक यामुळे हुरडा ज्वारीला इतका दर मिळतो असेही नलवडेंनी नमूद केले.

नलावडे यांच्या शेतातला हुरडा ज्वारी खाण्यासाठी अनेकजण त्यांच्या शेतात थेट हुडा ज्वारीची पार्टी करण्यासाठी येतात. याशिवाय तीनशे रुपये किलो दराने ही हुरडा ज्वारी विकत घेऊन जातात. शेतकऱ्यांच्यासाठी अधिकचं आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे उत्तम पीक हुरडा ज्वारी असून त्यासाठी नलावडे शेतकऱ्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम देखील करतात असे रामचंद्र खाडे (प्रगतशील शेतकरी, बेडग) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT