Parali Police Station विनोद जिरे
ऍग्रो वन

Beed: लिंबू उद्योगाच्या नावावर शेतकऱ्याला तब्बल 14 लाखाला गंडा

दरम्यान शेतकरी तांदळे यांच्या तक्रारीवरून मनीषा देवीदास तंवर , स्मिता पांडुरंग बोडके यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

विनोद जिरे

बीड - लिंबू उद्योगासाठी केंद्र सरकारच्या योजनेमार्फत 90 टक्के अनुदान मिळवून देतो. असं म्हणत दोन महिलांनी शेतकऱ्याला (Farmer) तब्बल 14 लाखांना गंडा घातला आहे. हा खळबळजनक प्रकार बीडच्या (Beed) परळी (Parali) तालुक्यातील सारडगाव येथे उघडकीस आला आहे.

हे देखील पहा -

प्रदीप शत्रुघ्न तांदळे असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे . तुमच्या संस्थेस भारत सरकारच्या लघु, सूक्ष्म व मोठ्या कर्ज योजनेंतर्गत 90 टक्के अनुदानावर लिंबू प्रक्रिया उद्योग सुरू करून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर सारडगाव येथे येऊन पाहणी केली. यादरम्यान प्रदीप तांदळे यांच्याकडून फोन पेच्या माध्यमातून तब्बल 14 लाख 5 हजार रुपये उकळले.

मात्र त्यानंतर प्रक्रिया उद्योगाला मंजुरी मिळाली ना अनुदान आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रदीप तांदळे यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली . दरम्यान शेतकरी तांदळे यांच्या तक्रारीवरून मनीषा देवीदास तंवर , स्मिता पांडुरंग बोडके यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात रंगली म्हशींची सौंदर्य स्पर्धा

दिवाळीत काळाचा घाला! काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा जिवंत जळून मृत्यू, फटाक्यांच्या दुकानात भीषण स्फोट

Cham Cham Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा बंगाली मऊ आणि रसाळ चमचम मिठाई; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: पक्ष वाढवणार की संपवणार आहात? शिंदेंनी टोचले पालकमंत्र्यांचे कान, बैठकीत नेमकं काय झालं?

Ramayana Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; ५ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार, 'या' चित्रपटांचा रेकॉर्ड केला ब्रेक

SCROLL FOR NEXT