rise in turmeric price near washin cotton price dropped in parbhani  saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : हळद तेजीत, कापसाच्या दरात घसरण

गतवर्षी तब्बल २० हजार रुपये प्रती क्विंटलवर पोहोचेलें हळदीचे दर थेट ९ हजार रुपये प्रती क्विंटलवर घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

Siddharth Latkar

- मनाेज जयस्वाल / राजेश काटकर

Farmers News :

पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकदा चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतक-यांना (farmers) दिलासा मिळाला आहे. दूसरीकडे परभणी जिल्ह्यात कापसाच्या दरात घसरण झाली आहे. परिणामी शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. कापसाला दर मिळावा यासाठी आणखी किती वाट पाहात बसायची असा सूर कापसाची साठवणूक केलेले शेतक-यांतून उमटू लागला आहे. (Maharashtra News)

हळदीचे दर पुन्हा १२ हजारांवर

पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दरात वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी घसरण झाली होती. गतवर्षी तब्बल २० हजार रुपये प्रती क्विंटलवर पोहोचेलें हळदीचे दर थेट ९ हजार रुपये प्रती क्विंटलवर घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

आता मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रिसोड बाजार समितीत (risod bazar samiti) कांडी हळदीला कमाल १२ हजार ५०५ रुपये तर गट्टू हळदीला कमाल ११ हजार १०५ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

कापसाच्या भावात घसरण

परभणी जिल्हात हया खरीप हंगामात पावणेतीन लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. पावसाने मोठा खंड दिल्याने कापसाचे नुकसान झाले तर कापूस फुटताना पुन्हा अवकाळी पावसाने नुकसान झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण कापसावर असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावर्षी कापसाला 6500 ते 7000 रुपये क्विंटल भाव मिळत होता. परंतु आता त्यात 300 ते 400 रुपयांची घसरण होत आहे. सध्या कापसाला 6000 ते 6500 भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला होता पण भावात घसरण होत असल्याने आता किती दिवस कापूस सांभाळावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC महा एल्गार मेळाव्यापूर्वी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याला पाठवली नोटीस

Maharashtra Live News Update: गोकुळ दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ

Vasubaras 2025: वसुबारस म्हणजे काय? दिवाळीत का साजरी करतात?

Shocking: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, वर्गमित्रानेच केलं भयंकर कृत्य; कॉलेजच्या बाथरूमध्ये खेचत नेलं नंतर...

Spine surgery: मणक्याच्या शस्त्रक्रियेला घाबरुन जाऊ नका; भिती कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT