SSC HSC Exam 2024 : दहावी, बारावीच्‍या प्रात्‍यक्षिक परीक्षा घेण्याचा सरकारपुढे पेच, शिक्षण संचालकांचा परीक्षांवर बहिष्कार

या आंदोलनाला राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य फोरम, अखिल महाराष्‍ट्र माध्‍यम‍िक व उच्‍च माध्‍यम‍िक शाळा मुख्‍याध्‍यापक संयुक्‍त महामंडळ यांचा पाठिंबा आहे.
maharashtra shikshan sanstha sanchalak mandal andolan before ssc hsc practical exam
maharashtra shikshan sanstha sanchalak mandal andolan before ssc hsc practical examSaam TV

- पराग ढाेबळे

Nagpur News :

दहावी (ssc) आणि बारावीच्‍या (hsc) प्रात्‍यक्षिक परीक्षांचे साहित्‍य स्‍वीकारण्‍यास राज्‍य शिक्षण संस्‍था संचालक महामंडळाने नकार दिला आहे. यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा संचालकांचा निर्णयाने परीक्षा घेण्यास सरकार (maharashtra government) पुढे प्रश्न निर्माण झाला आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे महासचिव रवींद्र फडणवीस साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले सन 2012 पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या रिक्त जागेसह विविध मागण्या प्रलंबित आहेत. पुणे येथील बैठकीत संस्था चालकांनी इशारा देऊनही सरकारने चर्चेसाठी बोलवले नाही.

maharashtra shikshan sanstha sanchalak mandal andolan before ssc hsc practical exam
Success Story : आई-वडिलांच्या कष्टाचं मुलाने केले साेनं, 'खेलाे इंडिया' त राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकावर काेरलं नाव

यामुळे आक्रमक झालेल्या संचालक मंडळाने दहावी आणि बारावीच्‍या प्रात्‍यक्षिक परीक्षांचे साहित्‍य स्‍वीकारण्‍यास नकार दिला आहे. आगामी काळातील परीक्षेसाठी कर्मचारी आणि शाळा इमारत देण्यास नकार दर्शविला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान या आंदोलनाला राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य फोरम, अखिल महाराष्‍ट्र माध्‍यम‍िक व उच्‍च माध्‍यम‍िक शाळा मुख्‍याध्‍यापक संयुक्‍त महामंडळ, पुणे यांचा पाठिंबा असल्याचे रवींद्र फडणवीस यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

maharashtra shikshan sanstha sanchalak mandal andolan before ssc hsc practical exam
Hapus Amba : आंबाप्रेमींनाे! वाशी एपीएमसीत हापूसची विक्रमी आवक, जाणून घ्या पेटीचा दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com