red chillies, nandurbar saam tv
ऍग्रो वन

Loss Of Chilli : अवकाळीचा झटका... नंदूरबारच्या मिरची व्यापाऱ्यांना 50 लाखांचा फटका; सरकारच्या निर्णयाकडं लक्ष

सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा शेतक-यांसह व्यापा-यांची आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सागर निकवाडे

Nandurbar : नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतले जाते. इतर राज्यात मिरची निर्यात केली जाते परंतु अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मिरची पिकाला देखील बसला आहे. (Maharashtra News)

व्यापा-यांनी शेतकऱ्यांकडून मिरची विकत घेऊन सुकवण्यासाठी पथारीवर टाकली होती. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे (rain) व्यापारी वर्गाची एकच तारांबळ उडाली. पथारीवर सुकवण्यासाठी टाकण्यात आलेली मिरची पावसामुळे खराब झाली.

शेतकऱ्यांसोबतच (farmers) आता व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान व्यापाऱ्यांचे झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून व्यापाऱ्यांना देखील मदत करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. आता सरकार नेमका काेणता निर्णय घेणार याकडे मिरची उत्पादक शेतकरी आणि व्यापा-यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भेटीसाठी जावई आणि कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल

Paithani Saree Designs: ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची? हे आहेत 5 लोकप्रिय पैठणी साडी प्रकार

Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर

महापालिका रणधुमाळीत मोठा ट्विस्ट; ठाकरे बंधूचा राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव, नव्या समीकरणाची नांदी? VIDEO

Foot Care: गरम पाण्यात पाय ठेवून बसण्याने होतील 'हे' फायदे

SCROLL FOR NEXT