raju shetti Saam Tv
ऍग्रो वन

द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना पॅकेज द्या : राजू शेट्टी

एकरी चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

विजय पाटील

सांगली : नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा (insurance) योजना सक्षम करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी दिला आहे. ते सांगलीच्या मिरज तालुक्यातील लींगणूर येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्यासाठी आले हाेते. त्यावेळी शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आदी तालुक्यातील ६० ते ७० हजार एकर वरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. घडकुज, दावन्या आदीसह अन्य कारणांनी संपूर्ण द्राक्ष बगाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. यामुळे एकरी चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा साडेचार हजार कोटीचा आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे ,धीर देणे आणि पाहणी करण्यासाठी शेट्टी रविवारी मिरज पूर्व भागात आले होते. त्यावेळी शेट्टी यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी. अन्यथा रस्त्यावर उतरू असे नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अफवांचा खेळ संपला, महाडिकवाडीतील भीतीचं भूत उतरलं, पोलीस-अंनिसने केला सत्याचा उलगडा

Woman Saree Look: साडी नेसलेल्या मुली मुलांना का आवडतात?

Maharashtra Live News Update: आबा बागुल यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT