rajendra pawar saam tv
ऍग्रो वन

Nashik: कोश्यारींच्या हस्ते कृषी पुरस्कार स्विकारण्यास राजेंद्र पवारांचा नकार

आज नाशिक येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी पुरस्कार वितरण सोहळा पार पडत आहे.

मंगेश कचरे

बारामती : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबतीत मध्यंतरी केलेल्या वक्तव्यामुळे राजेंद्र पवार (Rajendra Pawar) राज्यपालांच्या हस्ते पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार (panjabrao deshmukh krishi award) स्विकारण्यास नकार देत कृषी कर्मचाऱ्यांच्या हस्ते कृषी कार्यालयात पुरस्कार स्वीकारेन अशी भूमिका आज (साेमवार) बारामती (baramati) येथे जाहीर केली आहे. (rajendra pawar latest marathi news)

राज्य सरकारच्यावतीने नाशिक (nashik) येथे आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भूसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमात कृषीरत्न, कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण पुरस्कारार्थी यांचा सत्‍कार साेहळा आयाेजिण्यात आला आहे. या कार्यक्रमास बारामतीचे कृषी भूषण राजेंद्र पवार हे अनुपस्थित राहिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारायचा नसल्याने आपण तेथे गेलाे नसल्याचे पवार यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

पवार म्हणाले राज्यपाल हे वादग्रस्त विधान करुन शांततेचा भंग करणारी व्यक्ती असल्याचे माझे मत आहे. फुले दाम्पत्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत राज्यपालांनी वादग्रस्त विधान केली आहेत. ते आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि अस्मितांवर विनाकारण घाला घालत आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी कृषी कर्मचाऱ्यांच्या हस्ते कृषी कार्यालयात जाऊन पुरस्कार घेईन.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT