Pune: 500 हून अधिक शेतकऱ्यांना 23 कोटींचा गंडा, एक अटकेत
Pune: 500 हून अधिक शेतकऱ्यांना 23 कोटींचा गंडा, एक अटकेत Saam Tv
ऍग्रो वन

Pune: 500 हून अधिक शेतकऱ्यांना 23 कोटींचा गंडा, एक अटकेत

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे: शेतात शतावरी, अश्‍वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड करून त्या विकत घेण्याचे आमिष दाखवून एकाने ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची तब्बल २३ कोटी ४५ लाख रुपयांना गंडा घातल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे, सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर (वय – ३८, रा. आकाशदीप सोसायटी, धायरी) याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणीसंबंधी राहुल शहा (वय – ४६, रा. वाळवेकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पाटणकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात Sahakar nagar Police Station फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

काय आहे नेमके प्रकरण?

ऋषिकेश पाटणकर या आरोपीने तीन वर्षांपूर्वी शून्य हर्बल अग्रो डेव्हलपमेट प्रा. लि. कंपनीची स्थापना केली होती. त्याने असंख्य शेतकरी आणि गुंतवणूकदार सांगितले की, शेतात त्यांनी शतावरी आणि अश्वगंधा औषधी वनस्पतीची त्यांच्या शेतात लागवड करावी. हे येणारे पिक तो स्वतः विकत घेणार आणि त्यांना दरवर्षी एकरी ३ लाख रुपये मोबदला देणार असे आमिष दाखविले. यासाठी एकरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांनी कंपनीकडे जमा करायची आणि त्यानंतर कंपनी रोपे देणार, त्यांची लागण ते स्वत: करणार, सुपर व्हिजन करणार, खते देणार, एक वर्षांनी कंपनी स्वत: काढणी व वाहतूक करुन शेतकऱ्यांना जागेवर पैसे देणार अशी विविध आश्वासने दिली आणि आपल्या जाळ्यात ओढले.

त्यानुसार अमिषाला बळी पडून सोलापूर, पुणे, रायगडसह अन्य जिल्ह्यातील अनेकांनी शेतात कंपनीकडून रोपे घेतली आणि ती घेऊन लागवड केली. त्यानंतर १८ महिन्यांनी त्यांनी माल सुद्धा काढून नेला. परंतु, शेतकऱ्यांना पैसे मात्र दिले नाही.

गेले दोन वर्षे शेतकरी पुण्यातील अरण्येश्वर येथील कंपनीच्या कार्यालयात पैसे भेटण्यासाठी हेलपाटे मारत होते. त्याशिवाय केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक Shripad Naik यांचीही शेतकऱ्यांनी भेट घेतली. तरीही काही उपयोग झाला नाही. शेवटी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता Amitabh Gupta यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने Crime Branch तपास करुन ऋषिकेश पाटणकर याला अटक Arrest केली आहे. त्याने अशा प्रकारे असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदार यांची सुमारे २३ कोटी ४५ लाख १ हजार ९९४ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT