Bhor News Saam tv
ऍग्रो वन

Bhor News : झाडपाला खाण्यातून विषबाधा, आठ शेळ्यांचा मृत्यू; पुण्याच्या भोर तालुक्यातील नाटंबी गावातील घटना

Pune Bhor News : शेतकरी विजय खोपडे हे मागील बारा वर्षापासून शेळीपालन व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे ५५ शेळ्या आहेत.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

भोर (पुणे) : रानावनात चरायला सोडलेल्या शेळ्यांच्या खाण्यात विषारी झाडपाला आला असून त्यातून विषबाधा झाली. चरत असताना शेळ्या अचानक खाली पडल्या. यात आठ शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना पुण्याच्या भोर तालुक्यातील नाटंबी गावात घडली आहे. त्यामुळे शेतकरी विजय शिवाजी खोपडे (रा .नाटंबी) यांचे एक लाखाहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.

नाटंबी (ता. भोर) येथील शेतकरी विजय खोपडे हे मागील बारा वर्षापासून शेळीपालन व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे ५५ शेळ्या आहेत. गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांनी ५५ शेळ्या रानात चरायला सोडल्या होत्या. सर्व शेळ्या चरत असताना त्यातील आठ शेळ्या अचनाक जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्या. त्यानंतर काही वेळातच शेळ्यांचा मृत्यू झाला. शेळ्यांच्या खाण्यात विषारी झाडपाला आला असून त्यातून विषबाधा होऊन शेळ्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्याने (Farmer) व्यक्त केला आहे.

१ लाखाचे नुकसान 
मृत्यू झालेल्या शेळ्यांमध्ये पंधरा हजार रुपये एका शेळीची किंमत असलेल्या राजस्थानी जातीच्या पाच शेळ्या आणि बारा हजार रुपये एका शेळीची किंमत असलेल्या इतर जातीच्या तीन शेळ्यांचा मृत्यू झाला असून शेतकर्याचे एक लाख अकरा हजारांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

Tuesday Horoscope : लक्ष्मीची विशेष कृपा होणार; ५ राशींच्या लोकांची भरभराट होईल, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Crime News: पंधरा वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर जडला मामीचा जीव; लग्नाला नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

Asrani: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे पूर्ण नाव माहितीये का?

SCROLL FOR NEXT