शॉर्ट सर्कीटमुळे शेतात भीषण आग; 100 एकर ऊस जाळून खाक, जवळपास 1 कोटींचे नुकसान Saam Tv
ऍग्रो वन

शॉर्ट सर्कीटमुळे शेतात भीषण आग; 100 एकर ऊस जाळून खाक, जवळपास 1 कोटींचे नुकसान

परभणी (Parbhani) जिल्ह्यात पालम तालुक्यामध्ये आगीमुळे तब्बल एक नाही २ नाहीतर तब्ब्ल १०० एकरावरील ऊस जळून गेल्याची धक्कादायक घटना

राजेश काटकर

परभणी: परभणी (Parbhani) जिल्ह्यात पालम तालुक्यामध्ये आगीमुळे तब्बल एक नाही २ नाहीतर तब्ब्ल १०० एकरावरील ऊस जळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यात फळा आणि सोमेश्वर शिवारामध्ये दुपारी १ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. शॉटसर्कीटमुळे (short circuit) आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आग एवढी भीषण होती की, शेतकऱ्यांनी (farmers) गंगाखेड येथील अग्नीशमन दलास बोलविण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पालम (Palam) तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे (Sugarcane) क्षेत्र आहे. (Parbhani Terrible fire in the field to short circuit)

हे देखील पहा-

परिसरात कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या डोईजड ऊस झाला आहे. तो शेतात तसाच उभा असताना सोमेश्वर आणि फळा शिवारात शिवरस्त्याजवळ शॉट सर्कीट होवून ऊसाला आग लागली आहे. सुरूवातीला आग विझविण्याचा केविलवाना प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता. परंतु, आग मोठ्या क्षमतेने लागल्याने शेतकऱ्यांनी गंगाखेड येथील अग्नीशमन (Fire fighting) दलास पाचारण कारवाई लागले आहे. अग्नीशम पथक येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

या वाऱ्यामुळे ही आग वनव्यासारखी एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊ लागली. ती वाळलेल्या पाचटीमुळे विझविता आली नाही. आगीचे मोठं- मोठे लोळ निर्माण होऊ लागले होते. या आगीत भक्षस्थानी जवळपास १०० एकरावर ऊस सापडला आहे. परिमाणी, फळा आणि सोमेश्वर गावात जवळपास ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे. सर्वांचे मिळून १ कोटी रूपयापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज दुपारी २:१५ वाजेपर्यंत आग विझली नव्हती. (Parbhani Terrible fire in the field to short circuit)

वणवा बघण्यासाठी दोन्ही गावामधील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. अद्याप महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. परंतु, पालम पोलिस ठाण्याचे पोनि प्रदीप काकडे यांनी घटनास्थळी धाव घेवून शेतकऱ्यांना सूचना दिले आहेत. या परिसरात आणखी २०० एकर ऊस असल्याची माहिती फळा गावचे सरपंचानी यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT